
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. केंद्र सरकारनंतर महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना आहे. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. ही योजना पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. नमो शेतकरी योजना नक्की आहे तरी काय? या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? ते जाणून घ्या. (Namo Shetkari Yojana)
नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत तीन समान हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. प्रत्येक २ हजार रुपये दिले जातात. ही योजना पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत ६ हजार रुपये दिले जातात. तर राज्य सरकारकडून ६ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपये दिले जातात. या योजनेत कोट्यवधी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? (Who Will Get Benefit Of Namo Shetkari Yojana)
नमो शेतकरी योजनेत फक्त महाराष्ट्रातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. या शेतकऱ्यांकडे शेती असणे आवश्यक आहे. या शेतीची नोंद कृषी विभागात असायला हवी. याचसोबत शेतकऱ्याचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असायला हवे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधीत रजिस्ट्रेशन केलेले असावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.