LPG Subsidy Status : LPG सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात आले का? या 5 सोप्या स्टेप्सने करा चेक

How To Check LPG Subsidy Status : तुम्हालाही घरबसल्या तुमचा LPG Subsidy स्टेटस तपासायचे असेल तर पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
LPG subsidy status check
Online LPG Subsidy Verificationgoogle
Published On

भारतात अनेकजण अनेक योजनांचा लाभ घेत असतात. ज्यामध्ये LPG सबसिडीचाही (LPG Subsidy) समावेश आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या लिंक केलेल्या खात्यावर पैसे मिळतात. पण हे पैसे तुमच्या खात्यावर आले की नाही? हे तपासण्यासाठी तुम्हाला सतत एजन्सीच्या फेऱ्या घालाव्या लागतात. त्यामुळे तुमचा दिवस वाया जातो. पण आता मोठी अपडेट समोर आली आहे.

घरबसल्या सबसिडीचे पैसे तपासता येतात का?

तुम्ही तुमचे Subsidy चे पैसे घरबसल्या तपासू शकता. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शन आणि बॅंक खातं लिकं असणं गरजेचं आहे. याच्याच आधारावर तुम्ही काहीच सेकंदातच तुमच्या सबसिडीचा स्टेटस तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

LPG subsidy status check
Heart Attack: सावधान! हार्ट अटॅक येण्याआधी फक्त छातीत वेदना होत नाहीत; डॉक्टरांनी सांगितली ५ लक्षणे

सबसिडीचे पैसे जमा झाले का कसे तपासायचे?

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गॅस कंपनीची अधिकृत वेबसाईट प्रोर्टलवर जा. भारतात एचपी, इंडेन आणि भारत गॅसचा जास्त प्रमाणात वापर करतात. मग Check Subsidy Status या पर्यायावर क्लिक करा. मग तुम्हाला Give Your Feedback Online हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. मग तुम्हाला तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर त्यामध्ये टाकावा लागेल. त्यावर लगेचच ओटीपी पाठवला जाईल. मग लॉगिन होईल आणि तुम्हाला तुमचा सगळा स्टेटस तिथे पाहायला मिळेल. या सोप्या स्टेप्सने तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकता.

सबसिडीचे पैसे मिळाले नाहीत तर काय करावे?

तुम्हाला जर बरेच दिवस सबसिडीचे पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सगळ्यात आधी आधार कार्ड बॅंक खातं आणि गॅस कनेक्शन लिंक आहे का? हे तपासा. नसेल तर ते करा. तसेच तुमचं खातं अॅक्टीव्ह आहे का? याचीही तपासणी करा.

LPG subsidy status check
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com