LPG Cylinder Price : LPG सिलेंडरच्या दरात मोठा बदल! 2 ऑक्टोबरला किती रुपयांना मिळतोय गॅस? जाणून घ्या नवीन दर

LPG Price Hike: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच LPG दरांमध्ये बदल झाला आहे. कमर्शियल सिलिंडर महागला असून घरगुती सिंलिडरचे दर स्थिर आहेत.
LPG Price Hike
LPG Price Hikemeta ai
Published On: 

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजीही १ ऑक्टोबर लागू झालेले दरच कायम आहेत. यावेळी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

मुंबईत घरगुती सिलिंडर ९४१.५०, तर कमर्शियल सिलिंडर २,७६३.५० आहे. कोलकात्यात घरगुती सिलिंडर ९६८ आणि कमर्शियल सिलिंडर २,९४६.५० आहे. बंगळुरूमध्ये अनुक्रमे ९४४.५० आणि २,८९३.५०, तर चेन्नईमध्ये ९५७.५० आणि २,९७८.५० दर आहेत.

दिल्लीमध्ये १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात ६२.५० ची वाढ झाली असून, आता तो २८१० रुपयांना मिळत आहे. सप्टेंबरमध्ये याच सिलिंडरची किंमत २,७४७.५० होती. दुसरीकडे, दिल्लीतल्या १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९४२ इतकी आहे.

LPG Price Hike
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग रखडला तर कर्मचाऱ्यांना लाखोंचा फटका? ₹3.32 लाखांचं संपूर्ण गणित पाहा

हैदराबादमध्ये घरगुती सिलिंडर ९९४ आणि कमर्शियल सिलेंडर ३,०५८.५० आहे. कटकमध्ये घरगुती सिलिंडर ९६८ आणि कमर्शियल २,९४७.५०, तर कोयंबतूरमध्ये अनुक्रमे ९५९ आणि ३,००२.५० दर आहे. रांचीमध्ये घरगुती सिलिंडरचा दर १,०१०.५०, तर कमर्शियल सिलिंडरचा दर २,९८८ आहे.

LPG Price Hike
Chanakya Niti : नातेवाईकांना 'या' 7 गोष्टी सांगाल तर रस्त्यावर याल! चाणक्यांचा गंभीर इशारा

दर महिन्याच्या सुरुवातीला होतो आढावा

तेल विपणन कंपन्या साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला LPGच्या दरांचा आढावा घेतात. त्यानुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीला कमर्शियल सिलिंडर महाग करण्यात आला, तर घरगुती सिलिंडरचे दर तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्या जास्त भार पडलेला नाही. मात्र हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस घेणाऱ्यांना वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com