LPG गॅसच्या किंमती ते UPI; उद्यापासून या ५ नियमांमध्ये होणार मोठा बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका?

Rule Change From 1st April: १ एप्रिलपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १ एप्रिलपासून एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होणार आहेत.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On

१ एप्रिल म्हणजेच उद्यापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात पैशांसंबधित कामात अनेक मोठे बदल होणार आहेत. यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमती ते अगदी इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. १ एप्रिलपासून कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ते जाणून घेऊयात.

1. LPG च्या किंमती

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतो. दर महिन्याल एलपीजी गॅसच्या किंमती वाढतात किंवा कमी होतात. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एलपीजीच्या किंमती वाढणार की कमी होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे.

Rule Change
EPFO 3.0 लवकरच होणार लाँच; PF चे पैसे ATM मधून पैसे काढणे ते क्लेम सेटलमेंट सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार

2. क्रेडिट कार्डचे नियम

१ एप्रिलपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये रिवॉर्डपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे.SBI ने SimplyCLICK क्रेडिट कार्डवर स्विगीवरील रिवॉर्ड ५ टक्क्यांवरुन २.५ टक्के केले आहे. Air India ने सिग्नेचर पॉइंट्स ३० वरुन १० केले आहेत.

3. बँकेचे नियम (Bank Rules)

एप्रिल महिन्याल स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकांनी सेव्हिंग अकाउंटमधील किमान बॅलेंसच्या नियमांमध्ये बदल केले आहे. बँकेच्या खातेधारकांच्या किमान बॅलेंसच्या रक्कमेत बदल करण्यात आले आहे. जर तुमच्या खात्यात तेवढे पैसे नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

4. UPI चे नियम (UPI Rules)

१ एप्रिलपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. जे यूपीआय अकाउंट्स खूप दिवसांपासून अॅक्टिव्ह नाही आहेत त्यांची सर्व्हिस बंद केली जाणार आहे. त्यामुळे तुमचे अकाउंट सक्रिय नसेल तर ते लगेच सक्रिय करा.

Rule Change
SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! मिळणार भरघोस परतावा; गुंतवणुकीसाठी उरले फक्त ४ दिवस

5. टॅक्ससंबंधित नियम (Tax Rules)

टॅक्ससंबधित अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन कर प्रणालीपासून ते टीडीएस, टॅक्सवर सूट मिळणार आहे. १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे. याचसोबत स्टँडर्ड डिडक्शनदेखील ७५००० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे १२.७५ लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे.

Rule Change
GST Rule Change: १ एप्रिलपासून GST च्या नियमांमध्ये मोठा बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com