LPG Cylinder Price : LPG सिलिंडर पुन्हा स्वस्त झाला, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

LPG Cylinder Price : एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थेच आहेत. मुंबई, पुणे, कोलकाता आणि चेन्नई येथील एलपीजी दर जाणून घ्या.
LPG Cylinder Price
LPG CylinderSaam TV
Published On

LPG Gas Price : एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा कमी केल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आलया आहेत. घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे आहेत, दरांमध्ये कोणतीही वाढ अथवा कपात करण्यात आलेली नाही. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅसची किंमत १५८०.५० रूपये इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात येत आहे. एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रूपयांची कपात करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात एलपीजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये पाच रूपये कपात करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये किमतीत १५.५० रूपयांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्याआधी सिलिंडरच्या किमती सातत्याने कमी होत होत्या. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या (आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल) दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात.

LPG Cylinder Price
Horoscope Today : सोमवारचा दिवस ४ राशींसाठी ठरणार भाग्याचा; ८ राशींचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १० रुपयांनी कमी करण्यात आली. आता दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५८०.५० रुपये आहे. नोव्हेंबर महिन्यात सिलिंडरची किंमत १५९०.५० रुपये होती. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत अद्याप ८५३ रुपये इतकी आहे.

LPG Cylinder Price
Local Body Election : मोठी बातमी! २० तारखेला मतदान, २१ ला मतमोजणी, आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई-पुण्यात गॅस सिलिंडरच्या किंमती किती ?

मुंबई आणि पुण्यामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,५३१.५० रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत १,६८४.०० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ते १,७३९.५० रुपये इतकी झाली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमतीत कोणताही बदल झाला नाही. घरगुती सिलिंडरची किंमत ८ एप्रिल रोजी शेवटची बदलण्यात आली होती. मुंबईत ८५२.५० रुपये, दिल्लीमध्ये ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये इतकी किंमत आहे.

LPG Cylinder Price
BJP : भाजप बाटलेला पक्ष, फोडाफोडीत त्यांचं आयुष्य चाललंय; अजित पवारांच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

एटीएफच्या किंमतीत वाढ -

विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत एटीएफची किंमत आता प्रति किलोलिटर $८६४.८१ झाली आहे. म्हणजेच १,००० लिटर एटीएफसाठी ९९,६७६.७७ रुपये द्यावे लागतील. तर मुंबईत $८६४.३५ इतकी झाली आहे.

LPG Cylinder Price
Mumbai Metro : २ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत, 'ही' मेट्रो मुंबईकरांचा वेळ वाचवणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com