LIC Policy : LIC ची जबरदस्त योजना, एकदा गुंतवणूक करा अन् निवृत्तीनंतर १ लाखाची पेन्शन मिळवा; जाणून घ्या सविस्तर...

LIC Jeevan Shanti Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकतात. एलआयसी जीवन शांती योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दरवर्षी १ लाख रुपये मिळणार आहे.
LIC Scheme
LIC SchemeSaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जावे, यासाठी गुंतवणूक करत असतात. अनेकजण नोकरीच्या सुरुवातीच्या काळापासूनच गुंतवणूक करतात. यामुळे त्यांना भविष्याची चिंता नसते. जर तुम्ही सुरुवातीपासूनच गुंतवणूक केली तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर नियमित वेतन मिळते. यासाठीच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असते. एलआयसीची अशीच एक योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्याने तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही.

एलआयसीची जीवन शांती पॉलिसी ही नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी राबवली गेली आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्याभर नियमित वेतन मिळणार आहे.

LIC Scheme
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

LIC जीवन शांती पॉलिसी ही एक सिंगल प्रिमियम योजना आहे. यात तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शनची हमी दिली जाते. तुम्हाला या योजनेत दरवर्षी १ लाख रुपये मिळू शकतात.

LIC च्या या पॉलिसीची वयोमर्यादा ३० ते ७९ वर्ष आहे. या योजनेत दरवर्षी पेन्शन मिळण्यासोबतच इतर अनेक फायदे आहेत. हा प्लान खरेदी करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाइप आणि डेफर्ड एन्युटी फॉर जॉइंट लाइफ अशा दोन पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकतात. जर तुम्हाला सिंगल प्लानमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकतात.

एलआयसीच्या जीवन शांती पॉलिसीमध्ये तुम्हाला दरवर्षी १ लाख रुपयांची पेन्शन मिळेल. यामध्ये तुम्ही तुमच्या पेन्शनची लिमिटदेखील ठरवू शकतात. जी तुम्हाला रिटायरमेंटनंतर आयुष्यभर मिळणार आहे. या गुंतवणूकीवर तुम्हाला भरघोस व्याजदेखील मिळणार आहे.

LIC Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! दोन वर्षात महिला होणार लखपती; कसं?जाणून घ्या सविस्तर

जर ५५ वर्षीय व्यक्ती LIC न्यू जीवन शांती पॉलिसी खरेदी करत असेल आणि त्यात ११ लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला ६० वर्षानंतर दरवर्षी १,०२,८५० रुपये पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन तुम्ही ६ महिन्यांनी किंवा प्रत्येक महिन्यालादेखील घेऊ शकतात.

जर तुम्ही ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ६ महिन्यांनंतर तुम्ही पेन्शन घेणार असाल तर तुम्हाला ५०,३६५ रुपये मिळतील. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन हवी असेल तर ८,२१७ रुपये पेन्शन मिळेल.

LIC Scheme
Government Scheme For Startup: तरुणांनो स्वतः चा बिझनेस सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनांमधून मिळतेय आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com