Renault Duster: ऐकलं का, ..ती पुन्हा येतेय! नवी Renault Duster लॉन्चबाबत मोठी अपडेट, भारतात कधी होणार लॉन्च?

Renault Duster Launching Postponed: नवीन जनरेशन डस्टर लाँच होण्यासाठी जर वेळ लागू शकतो. 2025 मध्ये हे मॉडेल भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा होती. पण या कारची लॉन्चिंग आता २०२६ पर्यंत पुढे ढकलेले जाऊ शकते.
Renault Duster
Renault Duster Launching PostponedGoogle
Published On

Renault Dusterच्या लॉन्चबाबत मोठी अपडेट समोर आलीय. भारतात यावर्षी लॉन्च होणारी Renault Duster बाजारात येण्यास अजून वेळ आहे. भारतात कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील कार पसंतीस उतरत आहेत. बाजारात अशा कारला मोठी मागणी आहे, पण Renault Dusterचं लॉन्चिंग पुढे ढकलल्या गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Renault Duster भारतात लॉन्च होणार असल्याने अनेकजण या कारची प्रतिक्षा करत होते.

Renault Duster
GST Council: जुन्या कार विक्रीवर 18% जीएसटी? GST च्या निर्णयानंतर सर्वसामान्यांमध्ये गोंधळ

परंतु कारची लॉन्च लांबणीवर गेल्यामुळे अनेकांच्या भ्रमनिरास झालाय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, नवीन पिढीचे डस्टर भारतात चाचणी करताना दिसले होते. Renault Dusterचं हे मॉडल वर्ष २०२५ मध्ये भारतात लॉन्च केलं जाणार होतं. परंतु आता हे मॉडल पुढील वर्षी अर्थात २०२६ मध्ये लॉन्च केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान Renault इंडियाचे मॅनेजर डायरेक्टर व्यंटरमन मल्लापल्ली यांनी कंपनीच्या योजनेबाबत माहिती दिली परंतु Dusterकार कधी लॉन्च होणार याबाबत माहिती दिली नाही.

Renault Duster
Loan Repayment Rules: लोन न भरल्यास बँक कर्मचारी तुमची गाडी जप्त करू शकतात का? काय सांगतो नियम?

या कार होणार लॉन्च

यावर्षी Triber आणि Kiger कार लॉन्च होतील. या दोन्ही मॉडल्सची सर्वाधिक विक्री होते. या दोन्ही मॉडल्सची विक्री ८० टक्के आहे. या नव्या जनरेशन मॉडल्सला चांगल्या स्टायलिंग आणि नव्या फीचर्ससह सादर केलं जाणार मॅनेजर डायरेक्टर व्यंटरमन म्हणाले, वर्ष २०२६ मध्ये एक नवीन एसयुव्ही लॉन्च होणार आहे. ही कार नवीन जनरेशनची Duster असू शकते. रेनॉल्ट डस्टरने कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लोकप्रिय आहे.

काय आहेत फीचर्स

नव्या जनरेशनच्या डस्टरमध्ये १०.१ इंचाचं टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि सात इंचाचे डिजिटल क्लस्टर सारखी नवी सुविधा या देण्यात आल्या आहेत. यात क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारखी फीचर्स देखील असतील. यासह प्रीमियम Arkamys 3D साउंड सिस्टम असणार आहे. यात स्टॅटर्ड सुरक्षा फीचर्समध्ये ६ एअर बॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com