GST Council: जुन्या कार विक्रीवर 18% जीएसटी? GST च्या निर्णयानंतर सर्वसामान्यांमध्ये गोंधळ

GST On Second Car: जीएसटी परिषदेने सेंकड हँण्ड कारच्या विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयावरुन सर्वसामान्यांमध्ये गोंधळ उडालाय. नेमका जीएसटी कसा लागणार हे आपण जाणून घेऊ.
GST Council
GST On Second CarSaam Tv
Published On

जीएसटी परिषदेनं जुन्या कारच्या विक्रीवर 18 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता जुनी कार विकल्यास तुमच्या खिशाला भार पडणार, अशी चर्चा सोशल मिडीयात रंगू लागली. मात्र खरंच असं होणार आहे का? पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. जीएसटी परिषदेनं वापरलेल्या कारच्या विक्रीवर 18 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतलाय.

त्यामुळे आता जुनी कार विकल्यास विक्रेत्याला 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागल्या.याबाबत अनेक उलटसुलट मुद्दे मांडले जातायत.. यावरुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक, बहुतेक लोकांना हा नियम समजलेला नाही. त्यामुळे कोणी 10 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि काही वर्षांनी 3 लाख रुपयांना विकली, तर 7 लाख रुपयांच्या मार्जिनवर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल, असा गैरसमज पसरला आहे. जो पूर्णपणे चुकीचा आहे.

GST Council
ITR Filling Update: ३१ डिसेंबरपर्यंत फाइल करा ITR; नाहीतर भरावा लागेल १०,००० रुपये दंड

त्यामुळे जुनी कार विकताना नेमका जीएसटी कधी भरावा लागणार आणि कोणाला हे समजून घेऊ.

जुनी कार,खिशाला भार?

जीएसटी कोणत्याही सामान्य व्यक्तीला भरावा लागणार नाही

जीएसटी कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवरच लागू

वैयक्तिक खरेदी - विक्रीत जीएसटी लागणार नाही

5 लाखांची कार ग्राहकाला 6 लाखांना विकल्यास,1 लाखांच्या नफ्यावर 18% जीएसटी, संपूर्ण 6 लाखांवर नाही

5 लाख रुपयांची कार 4 लाख 50 हजारांना विकल्यास जीएसटी नाही

GST Council
GST Council Meeting: Health- Life विमा आणि जुनी कार विक्रीवर GST; जीएसटी काउंसिलच्या बैठकीत मोठा निर्णय

त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जुनी कार विकून झालेल्या नफ्यावर जीएसटी भरावा लागणार नाही.जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर हा जीएसटी लागू करण्यात आलायं.त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. बिनधास्त जुनी कार विका आणि नव्या वर्षात नविन कारचा आनंद घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com