Petrol Diesel Rate (29th Feb 2024) : फेब्रुवारीच्या अखेरीस कच्चा तेलाचे भाव घसरले; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर

Petrol Diesel Price Today 29th February 2024 : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.54 वर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.07 वर व्यापार करत आहे.
Petrol Diesel Rate (29th Feb 2024), Petrol Diesel Price Today 29th February 2024
Petrol Diesel Rate (29th Feb 2024), Petrol Diesel Price Today 29th February 2024Saam Tv

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी नियमितपणे पेट्रोल-डिझेलचे भाव अपडेट होत असतात. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार तेलाच्या किमती राष्ट्रीय स्तरावर स्थिर आहेत.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.54 वर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.07 वर व्यापार करत आहे.

भारतात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमती या मालवाहतूक शुल्क, व्हॅट आणि स्थानिक कर यावर अवलंबून असतात. यामुळे राज्यात वेगवेगळे दर जाहिर केले जातात. त्यामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या (Diesel) किमती या केरळ आणि हरियाणामध्ये घसरल्या आहेत तर उत्तर प्रदेशात किमती (Price) वाढल्या आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रासह राज्यातील किमती

Petrol Diesel Rate (29th Feb 2024), Petrol Diesel Price Today 29th February 2024
Best Food For Men After 30s : वयाची तिशी ओलांडल्यानंतर पुरुषांनी हे ७ पदार्थ खायला हवेच!

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये (Price) आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये. आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.१७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.६८ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७६ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२६ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com