लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त योजना, ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज; कसा मिळवाल फायदा?

Lakhpati Didi Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना सरकार ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज देणार आहे. या योजनेचा कसा फायदा मिळवायचा ते घ्या जाणून...
Lakhpati Didi Yojana: लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त योजना, ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज; कसा मिळवाल फायदा?
Lakhpati Didi YojanaSaam tv
Published On

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने आपले लक्ष महिला सक्षमीकरणावर अधिक केंद्रित केलेले दिसत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने २०२३ मध्ये महिलांसाठी 'लखपती दीदी' योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश महिलांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देणे हे आहे.

देशातील महिलांना आत्मनिर्भर उद्योजक बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. उद्योग उभारण्यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे असे सरकारचे मत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. कोणती कागदपत्र लागतील हे आपण जाणून घेणार आहोत.

Lakhpati Didi Yojana: लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त योजना, ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज; कसा मिळवाल फायदा?
Bank Loan: ग्राहकांना मोठा दिलासा! PNB, BOB आणि कॅनरा बँकेचा EMI होणार कमी, कारण....

लखपती दीदी या योजनेअंतर्गत सरकार महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजाशिवाय कर्ज देते. यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. ही योजना बचत गटांशी संबंधित महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. लखपती दीदी या योजनेद्वारे महिलांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत केली जाते. तसेच, देशातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते.

या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज दिले जाईल. या योजनेअंतर्गत ३ कोटी महिलांना लखपती दीदी या योजनेशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Lakhpati Didi Yojana: लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त योजना, ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज; कसा मिळवाल फायदा?
Marriage Loan: लग्न करायचंय, पण हाती पैसा नाही? काळजी नको, खर्चासाठी मिळतंय कर्ज, कुठे कराल अर्ज जाणून घ्या

कोणाला मिळेल लाभ?

लखपती दीदी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेतील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे जर एखाद्या महिलेने या योजनेसाठी अर्ज केला तर तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. जर घरातील सदस्य सरकारी नोकरी करत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

तसंच, ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा महिलाच या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल. ३ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Lakhpati Didi Yojana: लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त योजना, ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज; कसा मिळवाल फायदा?
SBI Home Loan: खुशखबर! होम लोन झालं स्वस्त, स्टेट बँकेचा मोठा निर्णय! तुमचे किती रुपये वाचणार?

कसा करायचा अर्ज?

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना बचत गटांतर्गत व्यवसाय योजना सादर करावी लागेल. त्यांचा व्यवसाय योजना तयार झाल्यानंतर, बचत गट ती योजना सरकारला पाठवेल. सरकारी अधिकारी या योजनेचा आढावा घेतील आणि त्यानंतर जर अर्ज स्वीकारला गेला तर योजनेचे फायदे दिले जातील. त्यानंतर या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे देखील गरजेचे आहे. या योजनेसाठी मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे आहेत का हे तपासून घ्या. जर यामधील कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

Lakhpati Didi Yojana: लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त योजना, ५ लाख रुपयांपर्यंत व्याजाशिवाय कर्ज; कसा मिळवाल फायदा?
Bank Holidays: उद्यापासून सलग ४ दिवस बँका बंद, RBIने का दिली २७ आणि ३० तारखेला सुट्टी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com