Ladki Bahin Vs Ladli Lakshmi Yojana: लाडकी बहीण अन् लाडली लक्ष्मी योजनेत फरक काय? कोणत्या योजनेत मिळणार महिलांना अधिक लाभ? जाणून घ्या

Ladki Bahin Vs Ladli Lakshmi Yojana Benefits: सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील लाडकी बहीण आणि लाडली लक्ष्मी योजनेचा महिलांना अधिक फायदा मिळतो.
Ladki Bahin Vs Ladli Lakshmi Yojana
Ladki Bahin Vs Ladli Lakshmi YojanaSaam Tv
Published On

सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात.सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण योजना. या दोन्ही योजनांचा लाभ देशभरातील लाखो महिलांनी घेतला आहे. या दोन्ही योजनांमध्ये फरक काय ते आपण जाणून घेऊया. (Ladki Bahin Vs Ladli Lakshmi Yojana)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली गेली आहे. या योजनेत १८ ते ६५ वर्षांमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत केली जाते. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असावे. गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Vs Ladli Lakshmi Yojana
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

लाडली लक्ष्मी योजना (Ladli Lakshmi Yojana)

लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेश सरकारची योजना आहे. मध्य प्रदेशमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी सुरु करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत मुलींना सरकारकडून १,४३,००० रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाते.

या योजनेत मुलीला सहावीत प्रवेश घेण्यासाठी २००० रुपये दिले जातात. ९वीत प्रवेश घेण्यासाठी ४ हजार रुपये दिले जातात. अकरावी आणि बारावीत प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये दिले जातात. १२ वी नंतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी २५,००० रुपयांची मदत केली जाते. तर २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपयांची मदत केली जाते.

Ladki Bahin Vs Ladli Lakshmi Yojana
Government Schemes For Girls: मुलींसाठी सरकारच्या खास योजना! शिक्षणापासून ते लग्नापर्यंत मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com