Ladki Bahin Yojana: खुशखबर! पुढच्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट जमा होणार ₹ १५००; समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana May Month Installment Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना पुढच्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana newsSaam tv
Published On

लाडकी बहीण योजनेबाबत महिला फक्त एकच प्रश्न विचारत आहेत. मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत लाडक्या बहि‍णींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होईल, तरीही अद्याप मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कधी खात्यात खटाखट १५०० रुपये जमा होतील, असं महिला विचारत आहेत.

पुढच्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana May Month Installment)

मे महिना संपायला फक्त १ आठवडा उरला आहे. त्यामुळे याच एका आठवड्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून महिनाअखेरला पैसे जमा केले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातही तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींना पैसे मिळतील, अशी आशा आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: काय सांगता! 'या' महिलांना मिळणार नाही मे महिन्याचे पैसे

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहि‍णींची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे या फसवणूकीच्या घटना घडणार नाही. लाडकी बहीण योजनेत पुन्हा महिलांच्या अर्जांची पडताळणी करुन निकषाबाहेर असणाऱ्या महिलांची नावे बाद केली जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: २५०० फ्रॉड बँक खाती अन् १९,४३,७७९ रुपयांचे व्यव्हार; लाडकीच्या नावाने फसवणूक, गुजरात कनेक्शन

लाडक्या बहिणींचा पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलाच पात्र आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या घरी चारचाकी वाहन नसावे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही , सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com