Ladki Bahin Yojana: २० दिवसांत लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता, समोर आली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana Next Installment: लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे मिळू शकतात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान, आता फेब्रुवारी महिन्याला हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा सरकारवर; एसबीआयने थेट इशाराच दिला | VIDEO

२० दिवसात येऊ शकतात पैसे

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. परंतु या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो. त्यामुळे २० दिवसांमध्येही कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. (Ladki Bahin Yojana February Month Installment)

फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा आहे. त्यामुळे कदाचित २० तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते. त्यामुळे या महिन्यातही पैसे तेव्हाच येऊ शकतात.

Ladki Bahin Yojana
ladki bahin yojana : २५ हजार लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या? बोगस कागदपत्रांचा आधार घेणाऱ्यांवर गुन्हा नोंद होणार

अपात्र लाडक्या बहि‍णींचे अर्ज माघारी (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे महिलांना घाबरुन अर्ज माघारी घेतले आहेत. अपात्र महिलांनी अर्ज माघारी घ्यावेत, असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं होतं. त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी सध्या सुरु आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रानंतर आता देशातही लाडकी बहीण योजना? बजेटआधी पंतप्रधान मोदींनी दिले संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com