

महिना-दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाडक्या बहिणींसाठी आंनदाची बातमी समोर आली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरूवात सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी खात्यात जमा झाला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिल्यांच्या खात्यात १५०० रुपये पाठवले जातात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे महिला १५०० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत होत्या. आता दिवाळीच्या तोंडावर हा हप्ता मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाला ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. ही प्रोसेस टप्प्याटप्प्याने होत असून सर्वच महिलांना एकाच दिवशी हप्ता मिळेल असं नाही.
सर्वप्रथम आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये नोंदी तपासा. मग बँकेकडून आलेले SMS तपासा. तुम्हाला काहीच माहिती मिळाली नाही की, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. तिथे 'Applicant Login' या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. पुढे 'Applications Made Earlier' किंवा 'Beneficiary Status' या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.