Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

June Installment Update : लाडकी बहिण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील आठ दिवसांत ₹१५०० जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanagoogle
Published On

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये लाडकीच्या खात्यात कधी मिळणार, याची राज्यातल्या लाखो महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिन्याचे १० दिवस उलटून गेले तरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम अजून जमा झालेली नाही.पण यासंदर्भात एक संभाव्य तारीख समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या हप्त्याबद्दल महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरीत करण्यात येण्याची शक्यता आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ ते १७ जुलैदरम्यान पात्र महिलांच्या खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) माध्यमातून १५०० रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana
EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

सध्या राज्य सरकारने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना सोशल मीडियावरच्या अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावं अशा सूचना दिलेल्या आहेत.

याआधी सुद्धा या योजनेचे हप्ते काही दिवस उशिराने जमा झालेले आहेत. मे महिन्याचा हप्ता १५ जूननंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तसेच मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकाच वेळी १७ ते २० मे यादरम्यान जमा करण्यात आले होते. त्यामुळे या जूनच्या हप्त्यासाठी उशीर लागू शकतो. अशी शक्यता आहे.

सध्या राज्यातल्या १ कोटी ७० लाख पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचा हप्ता बंद करण्यात आला आहे. त्यांनी योजनेचे नियम मोडले त्यामुळे त्यांच्याकडून वसूली सुद्धा घेतली जाऊ शकते. तर १५ जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Ladki Bahin Yojana
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? वाचा कॅलक्युलेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com