
लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
लाडकीला रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली
पैसे जमा झाले की नाही असं करा चेक
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत. त्यामुळे महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली, असं म्हणायला हरकत नाही.(Ladki Bahin Yojana)
लाडकीच्या खात्यात जुलैचे १५०० जमा (Ladki Bahin Yojana July Month 1500 Rupees Installment Deposite)
लाडकी बहीण योजनेत रक्षाबंधनच्या दिवशी जुलैचा हप्ता येईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर लाडकीच्या जुलैच्या हप्ताची प्रोसेस सुरु झाली आहे, रक्षाबंधनच्या पुर्वसंध्येला पैसे जमा केले जातील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमादेखील झाले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये आले आहेत.
तुम्हाला पैसे आले की नाही, असं करा चेक (Ladki Bahin Yojana 1500 deposite or not, How to check)
लाडकी बहीण योजनेत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त बँकेच्या अॅपवर जायचे आहे. त्यानंतर बॅलेन्स किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणी पैसे पाठवले हे समजेल. यावरुन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही याची माहिती मिळेल.
याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात. तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करु शकतात. याचसोबत तुम्ही बॅलेन्स चेक करु शकतात. त्यावरुन तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही समजेल.
लाडकी बहीण योजना काय आहे?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. ही योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना किती पैसे मिळतात?
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.
लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना पैसे मिळतात?
२१ ते ६५ वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच पैसे मिळतात. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे, महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. याचसोबत महिला सरकारी कर्मचारीदेखील नसाव्यात.
लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता मिळाला का?
लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
लाडकी बहीण योजना कोणी राबवली?
लाडकी बहीण योजना २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. ही योजना महिला व बालविकास विभागाद्वारे चालवली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.