

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
ईकेवायसीत दुरुस्ती करण्याची मुदत वाढवली
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मंत्री आदिती तटकरेंनी खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीच्या दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली आहे. लाडकी बहीण योजनेत आता तुम्ही ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसी करु शकतात. ही मुदतवाढ त्या महिलांसाठी आहे ज्यांनी याआधी केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली त्यांच्यासाठी आहे.
ईकेवायसीची मुदत चौथ्यांदा वाढवली (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended)
लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची मुदतवाढ दिली आहे. याआधी ऑक्टोबर, डिसेंबर, मार्चमध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. महिलांना ईकेवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक महिलांची केवायसी झाली नाही, त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मागच्या वेळी केवायसी करताना अनेक महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली होती.
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर नाही असे होते. परंतु अनेकांनी याचे उत्तर चुकीचे दिले. महिलांना प्रश्न नीट कळला नाही त्यामुळे हा गैरसमज झाला आणि महिलांचा लाभ बंद झाला. दरम्यान, त्यानंतर आता ही चूक सुधारण्याची संधी महिलांनी दिली आहे.
केवायसीत दुरुस्ती कशी करायची? (Ladki Bahin Yojana eKYC Step by Step Process)
सर्वात आधी तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
तिथे तुम्हाला ज्या लाभार्थ्यांकडून केवायसीत चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत त्यांच्यासाठी संधी, असं दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. हा आधार नंबर याआधी केवायसी लाभार्थ्यांमध्ये मॅच होतो की नाही हे चेक केले जाईल.
यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो टाकावा.
यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
यानंतर केवायसीची प्रोसेस पूर्ण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.