Ladki Bahin Yojana: १८१ नंबर करा नोट; एक कॉल अन् लाडक्या बहिणींचे सर्व प्रॉब्लेम होतील Solved

Helpline 181 Number For Ladki Bahin Yojana Beneficiary: लाडकी बहीण योजनेच्या केवायसी आणि प्रलंबित हप्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी १८१ हेल्पलाइन सुरू करण्यात आलीय. केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे सरकारनं हेल्पलाइन सुरू केलीय.
Helpline 181 Number For Ladki Bahin Yojana Beneficiary
Ladki Bahin Yojanasaam tv
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेसाठी १८१ हेल्पलाइन नंबर सुरू

  • केवायसी करूनही हप्ता न मिळालेल्या महिलांना दिलासा

  • डिसेंबर हप्त्यासंदर्भातील तक्रारींसाठी कॉल करता येणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळेल, असं सांगितलं जात आहे. दरम्यान केवायसी करूनही अनेक महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. त्या महिलांसाठी सरकारनं दिलासा दिलाय. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया चुकली होती. त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी महिला बाल कल्याण विभागाने एक हेल्पलाइन नंबर जारी केलाय. या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून आपल्या शंकांचे निरसरन करू शकतात.

Helpline 181 Number For Ladki Bahin Yojana Beneficiary
Amrit Bharat Express: उत्तर महाराष्ट्र थेट जोडणार पूर्व भारताशी; आता नाशिक, जळगावहून थेट दार्जिलिंग गाठा, जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक

लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये. केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यावर आता राज्य सरकारने यावर तोडगा काढलाय. महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केलीय.

Helpline 181 Number For Ladki Bahin Yojana Beneficiary
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाभ,फक्त करा 'हे' काम?

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना केवायसीसंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक महिलांनी केवायसी करूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. या सुविधेचं निवारण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिलीय.

१८१ नंबरवर कॉल करा अन् समस्या विसरा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या. या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आदिती तटकरेंनी एक्सवर दिलीय.

योजनेसंदर्भातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आलंय. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.

‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाभ

ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्या होत्या. दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हप्ता न आल्यानं लाडक्या बहिणी संतप्त झाल्या होत्या. दरम्यान ई-केवायसीमध्ये चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या महिलांना पूर्ववत लाभ दिले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांशी योजना आहे. ही योजना ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. योजना लागू करताना विविध अटी-शर्ती ठेवण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com