Ladki bahin Yojana : काटेकोर निकषांमुळे लाडकीला टेन्शन; 'त्या' बहिणींना लाभातून वगळणार, पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki bahin Yojana News : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी...चारचाकीचा निकष लावल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणारेय. अपात्र लाडक्या बहिणींचा हफ्ता बंद करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. पाहूया एक रिपोर्ट
Ladki bahin Yojana News
Ladki bahin YojanaSaam tv
Published On

लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी सुरु आहे. याआधी योजनेच्या निकषांनुसार चारचाकी असलेल्या आणि एकापेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध घेण्यात आला. आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणारेय. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.

Ladki bahin Yojana News
Dr Sushrut Ghaisas : तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : डॉ. सुश्रुत घैसास यांचा पाय आणखी खोलात, पोलीस करणार कसून चौकशी

गरजू महिलांनाच लाभ मिळणार आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाले. दरम्यान विविध योजनांतर्गत लावलेल्या निकषांमुळे आधीच लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना 1000 रुपये लाभ मिळतो. आणि लाडक्या बहीण योजनेतून त्यांना 500 रुपयांचा हप्ता मिळतो.

Ladki bahin Yojana News
Mhada House : सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, कारण? पाहा व्हिडिओ

'लाडकी बहीण'ची सद्य:स्थिती पाहूयात

'लाडकी बहीण'ची सद्य:स्थिती

- 2.63 कोटी अर्जांची नोंद करण्यात आली होती

- छाननी केल्यानंतर पात्र अर्जांची संख्या 2 कोटी 47 लाख

- आठवा हप्ता 2 कोटी 33 लाख महिलांना मिळाला

दुसरीकडे लाडकीच्या घटत्या संख्येवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

लाडकीच्या उत्पन्नाची पडताळणी

उत्पन्न अधिक, लाभ बंद

कोर्टात जाऊन योजना बंद करतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Ladki bahin Yojana News
Ambernath Firing : महाराष्ट्र आहे की बिहार? दिवसाढवळ्या बिल्डरच्या घरावर गोळीबार, ठाणे जिल्हा हादरला

2025 च्या पहिल्या तिमाहीतल्या पडताळणीत सुमारे आठ लाख अपात्र बहिणींना वगळलं आहे. आता लाडकीच्या उत्पन्नाचा स्त्रोत तपासला जाणार आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात लाडकीची संख्या आणखी कमी होऊन सरकारचा आर्थिक भार हलका होणार हे निश्चित आहे. फक्त आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सरकार अपात्र लाभार्थ्यांना कात्री लावणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com