
कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिली करोडपती
CISF ऑफिसर आदित्य कुमार यांनी जिंकले १ कोटी रुपये
३३ वेळा फेल झाल्यानंतर क्रॅक केली UPSC
कौन बनेगा करोडपती (Kon Banega Crorepati) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. कौन बनेगा करोडपती सीझन १७चे पहिले करोडपती आयपीएस आदित्य कुमार झाले आहे. आदित्य कुमार यांनी अनेक प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. ते आदित्य कुमार हे CISF ऑफिसर आहेत. ते प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आदित्य कुमार हे सध्या पंजाबमधील संगरुर येथे एसपी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये १ कोटी रुपये जिंकले आहेत.
आयपीएस आदित्य कुमार यांचा प्रवास (IPS Aditya Kumar Become First Crorepati In KBC 17)
आदित्य कुमार यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. १२वी झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी खूप आधीपासून तयारी केली. त्यांनी अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज केले. रिपोर्टनुसार, त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याआधी ३० सरकारी परीक्षा दिल्या होत्या. परंतु त्यांना यश मिळाले नाही.
आदित्य यांनी एकदा सांगितले होते की, त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याआधी ऑल इंडिया इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा, केंद्रीय विद्यालय संघठन परीक्षा दिली होती.याचसोबत अनेक सरकारी परीक्षा दिल्या होत्या.त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.
यूपीएससी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले ते प्रिलियमिसमध्येच फेल झाले. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात प्रिलियम्स आणि मेन्स क्रॅक केली परंतु इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले. यानंतर चौथ्या प्रयत्नात शेवटी त्यांना यश मिळाले आणि त्यांनी परीक्षा पास केली.
आदित्य कुमार यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या तयारीसाठी घर सोडले होते. ते दिल्लीला राहायचे. त्यांनी सलग तीनवेळा अपयश आल्यानंतरही हार मानली नाही. त्यांनी १०१७ मध्ये परीक्षा पास केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.