Success Story: इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; २५व्या वर्षी IAS झालेले प्रतिक जैन आहेत तरी कोण?

IAS Pratik Jain Success Story: वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी प्रतिक जैन हे आयएएस अधिकारी झाले आहेत. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत आणि इच्छाशक्ती हे दोनच मार्ग आहेत. कधीही कोणतेही अपयश आले तरीही हार मानायची नाही, असं सांगितलं जातं. त्यामुळे नेहमी प्रयत्न सुरु ठेवायचे. असंच काहीस प्रतीक जैन यांनी केलं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि शिक्षणाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पास केली. ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी खूप कमी वयात यश मिळवले. (IAS Pratik Jain Success Story)

Success Story
Success Story: वडिलांकडून मिळाली प्रेरणा, ३ वर्षे मोबाईलपासून लांब, २२ व्या वर्षी केली UPSC क्रॅक; IAS नेहा ब्याडवाल यांचा प्रवास

२५व्या वर्षी IAS

प्रति जैन यांचा जन्म २५ जुलै १९९३ रोजी राजस्थानमधील अजमेर येथे झाला. ते २०१८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रतिक यांनी BITS Pilani येथून मेकॅनिकल इंजिनियरिंग आणि बायोलॉजिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर २०२० मध्ये JNU येथून पब्लिक मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली.

प्रतिक जैन यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांनी प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली परंतु त्यांना फायनल लिस्टमध्ये जागा मिळाली नाही. त्यांची निवड इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये झाली.

प्रतीक यांचे लक्ष्य आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी ८६ रँक प्राप्त केली.ते २५व्या वर्षी आयएएस अधिकारी बनले.

Success Story
Success Story: IIT,IIM मधून शिक्षण, लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS दिव्या मित्तल यांचा प्रवास

प्रतिक जैन यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. ते डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत हरिद्वार येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी हरिद्वारचे सीडीओ म्हणून काम पाहिले. यानंतर ते नैनिताल येथे उपजिल्हाधिकारी आणि एसडीएम म्हणून काम केले.

Success Story
Success Story: ९व्या वर्षी घरोघरी जाऊन पेपर विकले, परदेशातील नोकरी सोडली; भारतात येऊन USPC परीक्षा क्रॅक; IFS पी बालागुरुगन यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com