मुंबई : जिओने सर्व रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. जिओ ग्राहकांना ३ जुलैपर्यंत जुन्या किंमतीवर रिचार्ज करण्याची संधी असणार आहे. मात्र, जिओने रिचार्ज पोर्टफोलिओमधून दोन प्लान हटवले आहेत. दोन्ही स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले आहेत.
कंपनीने दोन्ही प्लानचे रिचार्जचे पर्याय सुरु ठेवले असते, तर भविष्यात कंपनीला मोठं नुकसान झालं असतं. याच पार्श्वभूमीवर कंपनीने दोन्ही प्लान्स पोर्टफोलिओवरून हटवले आहे.
पोर्टफोलिओमधून हटवलेल्या रिचार्ज प्लान्सचे दर वाढवण्याची शक्यता आहे. कंपनीने रिचार्जचे नवे दर देखील सांगितले आहेत. जिओच्या ३९५ रुपये आणि १५५९ रुपयांच्या प्लानविषयी माहिती समोर आली आहे.
दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेडमध्ये 5जी डेटा यायचा. या रिचार्जमध्ये कमी किंमतीत अधिक व्हॅलिडीटी होती. यामुळे ग्राहकांमध्ये या रिचार्जला पंसती होती. ३९५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. तर १५५९ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती.
दोन्ही प्लान्सममधून अनलिमिडेट 5 जीची सुविधा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या प्लानमध्ये रिचार्जमध्ये किंमती वाढलेल्या दिसतील. कंपनी १५५९ रुपयांचं रिचार्जची किंमत १८९९ रुपये करणार आहे.
या प्लानमध्ये २४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० 'एसएमएस'सोबत 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. ३९५ रुपयांच्या प्लानविषयी बोलायचं झालं तो प्लान ३ जुलैला ४७९ रुपयांना मिळणार आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटीसाठी ६ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच अनलिमिडेट कॉलिंग आणि दुसरे फायदे मिळतील.
दरम्यान, कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही प्लानमध्ये वाढ केली आहे. जिओ रिचार्जचे प्लान हे १५५ रुपयांच्या ऐवजी १८९ रुपयांनी सुरु होणार आहे. तर कंपनी पोस्टपेड प्लान २९९ रुपयांऐवजी ३४९ रुपयांना मिळणार आहे. कंपनी आता अनलिमिटेड 5 जीची सेवा दिवसाला २ जीबी आणि त्याहून अधिक डेटा मिळणाऱ्या प्लानमध्ये मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.