GST Collection: Budget 2024 सादर होण्यापूर्वी मिळाली गोड बातमी, जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात 10 टक्क्यांनी वाढ

GST Collection News: जानेवारी 2024 मध्ये सकल वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलन 1,72,129 कोटी रुपये इतके झाले आहे.
GST Collection
GST Collection Saam tv

January 2024 GST Collection:

जानेवारी 2024 (31.01.2024 च्या संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत) मध्ये सकल वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलन 1,72,129 कोटी रुपये इतके झाले आहे. जे गेल्या वर्षीपेक्षा 10.4% जास्त आहे. जानेवारी 2023 मध्ये (31.01.2023 रोजी संध्याकाळी 5:00 पर्यंत) 1, 55,922 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

GST Collection
Bajaj Pulsur N160 And N150: डॅशिंग लूक, पॉवरफुल इंजिन; दोन नवीन पल्सर भारतात लॉन्च; कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

यात खास गोष्ट म्हणजे, हे आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक मासिक संकलन आहे आणि या आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा 1.70 लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संकलन झाले आहे. सरकारने आयजीएसटी संकलनातून सीजीएसटी ला 43,552 कोटी रुपये आणि एसजीएसटी ला 37,257 कोटी रुपये अदा केले आहेत.  (Latest Marathi News)

एप्रिल 2023-जानेवारी 2024 या कालावधीत, एकत्रित सकल जीएसटी संकलनात (31.01.2024 च्या संध्याकाळी 5:00 पर्यंत) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6% वाढ झाली आणि ते 16.69 लाख कोटींवर पोहोचले. मागील वर्षी याच कालावधीत 14.96 लाख कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला होता.

GST Collection
Government Jobs: आरोग्य विभागात बंपर भरती, १७२९ हजार रिक्त पदं भरली जाणार; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवतो. ही आकडेवारी बुधवारी संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंतची (म्हणजे 31.01.2024) आहे. महिन्याचे अंतिम संकलन याहून अधिक असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com