

पितृपंधरवड्यात अनेकांचा कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो. ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या किमती घसरल्या. परंतु, इस्त्राईल हमास युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.
मागच्या आठवड्यात उच्चांकी दरापेक्षा सोने ५ हजारांनी स्वस्त झाले होते पण अशातच युद्धामुळे सोन्याच्या दरात आठवड्याभरातच पुन्हा ३ हजारांनी वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. अशातच आज सोन्याचा भाव हा ५९ हजारांवर पोहोचला आहे. येत्या सणासुदीच्या काळात ६० हजारांवर पोहोचू शकतो असे देखील म्हटले जात आहे. आजचा सोन्याचा भाव किती हे पाहूया.
1. सोन्याच्या दरात वाढ
सोन्याच्या (Gold) दराने आजही उच्चांकाची पातळी गाठली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,४१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ५९,०६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात प्रतितोळ्यासाठी ३८०० रुपयांनी वाढ झाली आहे.
2. चांदीचा आजचा भाव
चांदीच्या (Silver) दरात आज वाढ झाली आहे. त्यामुळे आज प्रति किलो चांदीसाठी ७२,६०० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीत पुन्हा यात दोन ते तीन हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
3. शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती
मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,९१० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ५८,९४० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ५८,९१० आज मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.