Train Ticket Refund Rule : रेल्वेचे तिकीट रद्द केल्यानंतर पैसे परत मिळतात का? काय सांगतो रेल्वेचा नियम

Rules For Train Ticket Cancellation : आपला प्रवास सुरक्षित व सोयीस्कर व्हावा यासाठी आपण रेल्वेचे तिकीट हे आधीच बुक करतो.
Train Ticket Refund Rule
Train Ticket Refund RuleSaam tv
Published On

Indian Railway Rule : गावी जाण्यासाठी किंवा कोणत्याही कारणानिमित्त राज्याच्या बाहेर जाण्यासाठी सोपा असतो तो ट्रेनचा प्रवास. आपला प्रवास सुरक्षित व सोयीस्कर व्हावा यासाठी आपण रेल्वेचे तिकीट हे आधीच बुक करतो. पंरतु, काही वेळेस आपल्याला ते तिकीट रद्द करावे लागते.

अशावेळी रेल्वे प्रवाशांकडून तिकीट रद्द करण्याचे पैसे घेते आणि हा नियम रेल्वेत तिकीट बुक केलेल्या एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि सेकंड क्लाससह सर्व वर्गांना लागू होते. किती पैसे कापले जातात ? तिकीट रद्द कसे कराल जाणून घेऊया सविस्तर

Train Ticket Refund Rule
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण ! महाराष्ट्रात आज एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार इतके रुपये; तपासा आजचे दर

1. रेल्वेत तिकीट परत करण्याचे नियम काय आहेत?

1. ट्रेन (Train) सुटण्याच्या 48 तास आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास तुम्हाला पैसे मिळू शकतात.

2. एसी फर्स्ट/एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकिटांवर 240 रुपये रद्द करण्यासाठी शुल्क आकारले जाते. तर एसी 2 टियर तिकिटांवर 200 रुपये (Money) आकारले जाते. AC 3 टियरवर 180 रुपये आणि AC 3 इकॉनॉमीवर 180 रुपये कापले जातात.

Train Ticket Refund Rule
How to Test Gold Purity At Home : तुमचं सोने खरे आहे की खोटे ? या सोप्या टिप्सवरुन कळेल

3. द्वितीय श्रेणीचे तिकीट रद्द केल्यास ६० रुपये शुल्क आकारले जाते.

4. ट्रेन सुटण्याच्या 48 तास ते 12 तास आधी तिकीट (Ticket) रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 25 टक्के कॅन्सलेशन चार्ज म्हणून कापले जाते.

5. जर कोणी ट्रेन सुटण्याच्या 12 तास ते 4 तास आधी तिकीट रद्द केले तर एकूण भाड्याच्या 50 टक्के रक्कम कॅन्सलेशन चार्ज म्हणून कापली जाईल.

Train Ticket Refund Rule
Indian Railway Rule : लहान मुलांसोबत रेल्वेतून प्रवास करताय ? आधी नियम तर वाचा, पैशांची होईल बचत

6. याशिवाय, ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही RAC आणि वेटिंग लिस्टची तिकिटे रद्द केल्यास तुम्हाला पूर्ण परतावा मिळेल. तसेच त्यात प्रति हेड लिपिक शुल्क वजा केले जाते.

2. ट्रेन लेट झाल्यावरही मिळतात पैसे

रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमची ट्रेन 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाली असेल आणि तुम्हाला आता प्रवास करायचा नसेल तर तुम्ही रिफंडचा दावा करु शकतात. यासाठी तुम्हाला तिकीटाची संपूर्ण माहीती दाखल करावी लागेल. ज्याला आपण टीडीआर असेही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com