
कर्नाटक सरकार आणि आयआरसीटीसीने संयुक्तपणे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन पॅकेज आणलं.
यात्रेकरूंना वाराणसी, गया, अयोध्या आणि प्रयागराजला भेट देता येणार आहे.
पॅकेजमध्ये प्रवास, राहण्याची सोय, शाकाहारी जेवण आणि प्रवास विमा समाविष्ट आहे.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत देव दर्शनाला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. कर्नाटक सरकार आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने एक खास ट्रॅव्हल पॅकेज लॉन्च केलंय. या अंतर्गत भारत गौरव काशी थीमवर अधारित टुरिस्ट ट्रेन ५ ऑक्टोबरपासून टुरिस्ट ट्रेन चालवणार आहे.
या ट्रेनमुळे यात्रेकरूंना वाराणसी, गया, अयोध्या आणि प्रयागराज यासारख्या पवित्र स्थळांना एकाच वेळी भेट देता येणार आहे. हा ट्रेनचा प्रवास एकूण ९ दिवस आणि ८ रात्रीचा असणार आहे. आयआरसीटीसीच्या मते, प्रवाशांना भारत गौरव पर्यटक ट्रेनमधील एसी क्लास ३ मधून प्रवास करावा लागेल. नॉन-एसी हॉटेल रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
यात दुहेरी किंवा तिहेरी शेअरिंग व्यवस्था असणार आहे. तसेच याच पॅकेजमध्ये सर्व प्रवाशांना जेवण (फक्त शाकाहारी) समाविष्ट आहे, तसेच प्रवास विमा आणि ट्रेन सुरक्षा देखील समाविष्ट आहे. नॉन-एसी बसेसद्वारे बदल्या आणि पर्यटन स्थळे पाहिली जातील.
या पॅकेज अंतर्गत भाविक खालील पवित्र स्थळांना भेट देतील:
वाराणसी - काशी विश्वनाथ मंदिर, तुलसी मानस मंदिर, संकट मोचन हनुमान मंदिर, आणि गंगा आरती.
अयोध्या - श्री रामजन्मभूमी मंदिर.
गया- विष्णुपद मंदिर आणि जन्मभूमि मंदिर
प्रयागराज- संगमवर पवित्र स्नान आणि हनुमान मंदिर, दरम्यान गंगा नदीमधील स्नान आणि गंगा आरती हे कार्यक्रम पाण्याची पातळीवर अवलंबून असेल. दरम्यान या ट्रेनचा प्रवास बेंगळुरुच्या यशवंतपूर स्टेशनपासून सुरू होईल. यासह प्रवाशी तुमकुरू, बीरूर, दावणगिरी, हावेरी, हुबली आणि बेलगाम स्टेशनवरून ही ट्रेन पकडू शकतील.
दरम्यान या प्रवास पॅकेजचं तिकीट प्रती यात्री २२,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु कर्नाटक सरकारने प्रवाशांना मोठा दिलासा देत तिकिटातील साडेसात हजार रुपये कमी केली आहेत, म्हणजेच ७५०० रुपयांची सब्सिडी सरकारकडून मिळणार आहे. म्हणजेच काय प्रवासी फक्त १५००० रुपयात हे ट्रेनचं तिकीट घेऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.