Iran-Israel War: इराण-इस्त्रायल युद्धाचा भारतावर परिणाम, पेट्रोल-डिझेल, सोन्याचे दर वाढणार; शेअर मार्केटही घसरला

Iran-Israel War Effect On India: इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम संपूर्ण देशावर होत आहे. या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. याचसोबत सोन्याच्याही दरात बदल होऊ शकतात.
Iran-Israel War
Iran-Israel WarSaam Tv
Published On

इराण इस्त्रायलमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरदेखील होणार असल्याचे सांगितले जात आहे. भारताचेदेखील नुकसान होऊ शकते.

Iran-Israel War
Iran Attack On Israel: युद्धाचा भडका! इराणच्या हल्ल्यात इस्रायल हादरला, १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली

मिडिया रिपोर्टनुसार, इराण आणि इस्त्रायलमधील या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होणार आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढू शकतात. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यावर आपोआप वाढणार आहेत.याचसोबत शेअर मार्केवरही परिणाम होणार आहे.

कशावर होणार परिणाम?

शेअर मार्केटमध्ये चढ-उतार

शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये पडझड झाली होती. जगभरात सर्वच शेअक मार्केटमध्ये घसरण झाली होती. इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भीती वाटत आहे.

पेट्रोल डिझेल महागणार

इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. या किंमती १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ७८.५ डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. त्यानंतर किंमती कमी झाल्या होत्या. दरम्यान, इस्त्रायलने इराणमध्ये तेलसाठा असणाऱ्या ठिकाणांवर हल्ला केलेला नाहीये. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर काय परिणाम होणार हा प्रश्नच निर्माण होत आहे.

Iran-Israel War
Water Scheme Scam : म्हैसाळ सिंचन योजनेत साडेदहा लाखांचा घोटाळा; ठेकेदारावर गुन्हा दाखल

सोन्याच्या किंमतीवर परिणाम

भारतासोबतच जगभरात सोन्याच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. सोन्याच्या किंमती जगभरात वाढल्या आहेत.भारतात सोन्याचे दर १ लाखांपार गेले आहेत. तर परदेशातही सोन्याच्या किंमती जास्त वाढल्या आहेत. सोन्याची किंमत ३,४३७ डॉलर प्रति तोळ्यावर व्यव्हार करत आहे.फक्त भारतावर नाही तर जगभरातील गोष्टींवर या युद्धाचा परिणाम होत आहे.

Iran-Israel War
Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळ्याच्या दरात २८०० रुपयांनी वाढ, आजचा दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com