IPS Aashna Chaudhary: ब्युटी विथ ब्रेन! तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS होण्याऐवजी झाल्या IPS अधिकारी; आशना चौधरी यांचा प्रवास

Success Story of IPS Aashna Chaudhary: आयपीएस आशना चौधरी सध्या चर्चेत आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
IPS Aashna Chaudhary
IPS Aashna ChaudharySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा काहीजण आयएएस होण्याचे सोडून दुसरं काहीतरी होण्याचा निर्णय घेतला. असंच काहीसं IPS आशना चौधरी यांनी केलं. त्यांची निवड आयएएस पदावर झाली होती. परंतु त्यांनी आयएएस नव्हे तर आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. आयपीएस आशना चौधरी या सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांना मथुरा येथे नवीन जबाबदारी दिली आहे.त्यांची आता मथुरा येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक(Assistant Suprident of Police) पदावर नियुक्ती झाली आहे.

IPS Aashna Chaudhary
Success Story: आईपण भारी देवा! UPSC च्या अभ्यासासाठी मुलापासून राहिली २ वर्षे दूर; मिळवली २ रँक; IAS अनु कुमारी यांचा प्रवास

कोण आहेत IPS आशना चौधरी? (Who is IPS Aashna Chaudhary)

आयपीएस आशना चौधरी या तरुण आणि तडफदार आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९८८ रोजी झाला. त्या मुळच्या उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातील पिलखुवा येथील रहिवसी आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल, सेंट मेरी स्कूल (उदयपूर) आणि दिल्ली पब्लिक स्कूल (गाझियाबाद) येथून घेतले.

यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्लीश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर साउथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश (IPS Aashna Chaudhary Crack UPSC In 3rd Attempt)

आशना यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर लगेचच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. २०२० मध्ये पहिल्यांदा त्यांनी परीक्षा दिली. यावेळी त्या अपयशी झाल्या. दुसऱ्या प्रयत्नात फक्त २.५ अंकावरुन त्या पास होण्यापासून राहिल्या. अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी शेवटी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

IPS Aashna Chaudhary
Success Story: संघर्षाच्या काळात गर्लफ्रेंडने दिली साथ; कोणत्याही कोचिंगशिवाय क्रॅक केली JPSC; अमन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS सोडून IPS झाल्या (Aashna Chaudhary Become IPS Instead Of IAS)

आशना यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना ११६ रँक मिळाली.यानंतर त्या आयएएस होऊ शकत होत्या. परंतु त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कायदा व्यवस्था आणि जनसेवेसाठी काम करायचे ठरवले.

मथुरा येथे मिळाली मोठी जबाबदारी (Mathura New ASP)

आशना यांना मथुरा येथे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची आता सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं.

IPS Aashna Chaudhary
Success Story: जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला IPS, पुन्हा UPSC क्रॅक; IAS रुवेदा सलाम यांचा प्रवास
Q

आशना चौधरी आयपीएस आहेत की आयएएस?(Is Aashna Chaudhary an IPS or IAS?)

A

आशना चौधरी या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Q

आयपीएस आशना चौधरी सध्या कुठे तैनात आहेत?(Where is IPS Aashna Chaudhary posted now?)

A

आशना चौधरी यांची नुकतीच २६ जुलै २०२५ रोजी मथुरा येथे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Q

आशना चौधरी यांचे पती कोण आहेत?(Who is the husband of IPS Aashna Chaudhary?)

A

IAS अभिनव सिवाच हे आशना चौधरी यांचे पती आहेत.

Q

आशना यांनी कितव्या प्रयत्नात यूपीएससी पास केली?

A

आशना यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Q

आशना यांना यूपीएससी परीक्षेत किती गुण मिळाले होते? (What is the marks of Aashna Chaudhary?)

A

आशना यांना ९९२ गुण मिळाले होते. यातील ८२७ लेखी परीक्षेत आणि १६५ मुलाखतीत मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com