सर्वांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. विशेषत, मुलींचं शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची पालकांना जास्त चिंता असते. त्यासाठी ते अनेक ठिकाणी गुंतवणूक आणि बचत करतात. मुलींच्या भविष्यासाठी सरकारच्या काही विशेष योजना उपलब्ध आहेत. यात तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळू शकतो. या योजना सुरक्षित आहेत. मुलींसाठीच्या या ६ योजनांबद्दल जाणून घ्या.
भारतातील बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये मुलींच्या भविष्यातील तरतुदीसाठी अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास खूप फायद्याचे ठरेल. या योजनांमुळे मुलींच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही. मुलींच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी लागणारा खर्च तुम्ही या योजनांच्या माध्यमातून मिळवू शकता.
1. सुकन्या समृद्धी योजना (७.६ टक्के वार्षिक परतावा)
जर तुम्हाला तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर सुकन्या समृद्धी योजना हा चांगला पर्याय आहे. ही योजना खास मुलींसाठी सुरू केली आहे. मुलींच्या लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी (Education) सरकारने ही योजना सुरू केली आहे. 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सध्या या योजनेत ७.६ टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये करसवलतीही देण्यात आल्या आहेत.
2. चिल्ड्रेन्स गिफ्ट म्युच्युअल फंड
चिल्ड्रेन्स गिफ्ट म्युच्युअल फंड ही मुलींसाठी चांगली योजना आहे. ही योजना मुलींसाठी भविष्यात फायद्याची ठरेल. ही योजना इक्विटी कर्जासह मिळेल.
3. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही कमी जोखमीची सरकारी योजना आहे. ही योजना संपूर्ण भारतातील पोस्ट ऑफिसमध्ये दिली जाते. मुलींसाठी या योजनेत गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे.
4. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट
पोस्ट ऑफिस (Post Office) टर्म डिपॉझिट(POTD)या योजनेची तुलना बँक एफडीशी करू शकतो. बँक एफडीप्रमाणेच ही योजनादेखील सुरक्षित आहे. मुलींसाठी गुंतवणूक करण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. १ वर्ष, २ वर्ष ३ वर्ष आणि ५ वर्षे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटचे दर हे ५.५%, ५.७% , ५.८%, ६.७% वरुन ६.६%, ६.८%, ६.९% आणि ७% पर्यंत वाढवले आहेत.
5. युनिट लिंक विमा योजना
युनिट लिंक विमा योजना (ULIP) ही देशातील मुलींसाठीची सर्वात मोठी योजना आहे. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीसाठी घेऊ शकता. या योजनेच्या गुंतवणुकीवर (Investment) उत्तम परतावा मिळतो. या योजनेचे इतर फायदेदेखील आहेत.
6. CBSE उडान योजना
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (HRD) सहकार्याने महिलांसाठी CBSE उडान योजना सुरू केली आहे. ही योजना पात्र उमेदवार महिला विद्यार्थ्यांना भारतातील विविध अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी जागा मिळवून देते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.