Robert Kiyosaki: 'सोने चांदीत गुंतवणूक करा, कारण...'; 'रिच डॅड पूअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचा सल्ला

Robert Kiyosaki On Investment: प्रत्येक व्यक्तीचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असते. प्रत्येक व्यक्तीचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असते. यासाठीच सोनेच चांदीत गुंतवणूक करा असा सल्ला प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आहे.
Robert Kiyosaki
Robert Kiyosakisaam Tv

प्रत्येक व्यक्तीचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असते. प्रत्येकालाच आपले आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगायचे असते. यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारणे खूप जास्त महत्त्वाचे असते. यासाठी अनेकजण रिअर इस्टेट, शेअर बाजारात गुंतवणूक करतात. परंतु सोने चांदीत गुंतवणूक केल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल असे रिट डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट टी कियोसकी यांनी सांगितले आहे.

रॉबर्ट टी कियोसाकी हे प्रसिद्ध लेखक आहे. ते नेहमी आर्थिक गुंतवणूकीचे सल्ले देत असतात. त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून सोने- चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Latest News)

लेखक रॉबर्ट टी यांनी एक्सवर पोस्ट करत सोने-चांदीत गुंतवणूक करण्यास सांगितले आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय की, 'सर्व काही तात्पुरतं आहे. स्टॉक्स, बॉण्ड्स, रिअल इस्टेट क्रॅश होणार आहे. युएसएवरील कर्ज वाढत आहे.तुम्ही स्वतः ला वाचवा. कृपया सोने चांदी खरेदी करा'.

रॉबर्ट टी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अमेरिकेवरील वाढत्या कर्जाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, 'दर ९० दिवसांनी अमेरिकेचे कर्ज १ ट्रिलियन डॉलरने वाढत आहे. अमेरिका दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे तुम्ही सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करा'.

Robert Kiyosaki
Petrol Diesel Price 13th April 2024: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

याआधीही रॉबर्ट वूड यांनी बिटकॉइनबाबत एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी लिहलं होतं की, 'बिटकॉइन २.३ दक्षलक्षपर्यंत पोहचेल असं कॅथी वुड यांनी सांगितले होते. माझा त्यांच्यावर विश्वास आहे'. त्यामुळेच लोकांनीही बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Disclaimer: सदर बातमी ही लेखकाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

Robert Kiyosaki
Toordal Price Increase: डाळींच्या किंमती कडाडल्या! तूरडाळ, मूगडाळींच्या किंमतीत वाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com