इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी मॅटरने भारतीय बाजारात 'मॅटर एरा' ही नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स वाहनधारकांना उपलब्ध करून दिले आहेत. ही बाईक इलेक्ट्रिक असूनही त्यात गियर सेटअप उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत १.९४ लाख रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे ही गाडी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती ऑनलाईन बुक करू शकता किंवा शोरूमला भेट देऊन बुक करू शकता. कंपनीने बाईकसोबत ३ वर्षांसोबत १ लाख किलो मीटरची वॉरंटी दिली आहे.
मॅटर एराच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचे हायपरशिफ्ट ट्रान्समिशन. या हायपरशिफ्ट ट्रान्समिशनला इनहाऊस डिजाईन केलेले असून ४ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. ही यंत्रणा तीन राईड मोडसह जोडली गेलेली आहे. ज्यामध्ये एकूण १२ गियर मोड कॉम्बिनेशनला परवानगी दिली गेली आहे. कंपनीने या बाईकमध्ये शक्तिशाली बॅटरी आणि मोटार दिली आहे. ही बॅटरी IP६७ रेटेड बॅटरी आहे जी एका चार्जमध्ये १७२ किमी पर्यंत रेंज देते. त्यात बसवलेल्या मोटारमुळे, ० ते ४० किमीचा वेग गाठण्यासाठी फक्त २.८ सेकंद लागतात. कंपनीच्या मते ही बाईक फक्त २५ पैसे या किमतीत चालवता येते.
या मोटरसायकलमध्ये ७ इंचाचा स्मार्ट टचस्क्रीन आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशन, राईड डेटा, म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत. त्यात ओटीए देखील अपडेट करण्यात आला आहे. मॅटर कंपनीच्या अॅपद्वारे बाईकमध्ये किलेस, रिमोट लाॅक अशा प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.