Indian Rupees : डॉलरच्या तुलनेत रूपया घसरण्यामागे हे काहे नेमके कारण, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

Indian Rupees Vs US Dollar : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण नेमकी का सुरु आहे, जाणून घेऊयात.
Indian Rupees
Rupee vs DollarSaam TV
Published On

मुंबई : (Indian Rupees Vs US Dollar) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याने इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल मशिनरी, फार्मा, केमिकल्स यांसारख्या क्षेत्रातील उत्पादन खर्चात वाढ होण्याची भीती अधिक गडद होत आहे. आज मंगळवारीही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच राहिली आणि एका डॉलरचे मूल्य 84.40 रुपये झाले.

भारतात अनेकांना व्यवसायाशी संबंधित बहुतांश कच्चा माल आयात करावा लागतो. रूपयाचे मुल्य कमी झाल्याने आता आयातीसाठी पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. दुसरीकडे पेट्रोलियम आणि खतांच्या वाढत्या आयात बिलामुळेही सरकारवर आर्थिक दबाव वाढणार आहे. सरकार खत आयात करते आणि ते अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांना देते. त्याचप्रमाणे सरकार गॅस सिलिंडरपासून उर्जेच्या इतर अनेक साधनांवर सबसिडी देते आणि आयात बिल वाढल्याने सरकारवर बोजा वाढतो. याला सामोरे जाण्यासाठी सरकार इतर वस्तूंवरील खर्चात कपात करू शकते.

Indian Rupees
Stock Market Crash : शेअर बाजारत अचानक भूकंप; बड्या कंपन्यांची मोठी पडझड, कोणते शेअर्स ठरले टॉप लुझर्स?

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयात-निर्यातीवर काय परिणाम होणार? 

तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन आणि निर्यात या दोन्हींमध्ये सातत्याने वाढ होत आहे, परंतु आताही आपल्या निर्यातीपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात जास्त आहे. आपण मोबाईल फोनसह इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून आहोत.

Indian Rupees
Business Idea: नोकरी सांभाळून तुम्ही सुरू करू शकता 'हे' बिझनेस; पगारासोबत मिळू शकतो बंपर कमाई

चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-सप्टेंबरमध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 15.6 अब्ज डॉलर होती आणि इलेक्ट्रॉनिक्स आयात 48 अब्ज डॉलर होती. त्याचप्रमाणे, या कालावधीत 26 अब्ज डॉलर किमतीची इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल मशिनरी आयात करण्यात आली. फार्मा आणि रसायनांशी संबंधित कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो.

रुपयाच्या घसरणीचा निर्यातदारांना फायदा होईल का?

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादित मालाची एकूण किंमत वाढेल आणि देशांतर्गत बाजारपेठेत माल महाग होऊ शकतो कारण उत्पादक केवळ ठराविक कालावधीसाठी खर्च वाढू शकतो. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे परदेशी बाजारपेठेतील या वस्तूंची स्पर्धात्मकताही कमी होऊन निर्यातीवर परिणाम होईल.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे निर्यातदारांना डॉलरमध्ये मोबदला मिळत असल्याने फायदा होतो. मात्र सध्या देशाच्या निर्यातीची कामगिरी चांगली नाही. त्यामुळे निर्यातदारांनाही रुपयाच्या घसरणीचा फारसा फायदा होणार नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) निर्यातीत केवळ एक टक्का वाढ झाली आहे. या काळात आयातीत सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Indian Rupees
Donald Trump: निवडणूक जिंकताच ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट पुतिन यांना केला फोन, युक्रेन युद्धावर चर्चा

परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांवर ताण वाढेल 

रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. ते त्यांच्या मुलांना डॉलरमध्ये पैसे पाठवतात आणि मजबूत डॉलरमुळे त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. मात्र, ज्या कुटुंबांचे नातेवाईक परदेशातून पैसे पाठवतात त्यांना रुपयाच्या कमकुवतपणाचा फायदा होईल. तसेच जे भारतात बसून विदेशातले काम करीत आहे आणि ज्यांना मिळकत ही डॉलरमध्ये होत आहे त्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com