Train Lower Berth: आता लोअर बर्थ तिकीट बुकिंगची झंझट संपली! रेल्वेने बदलले नियम

Train Lower Berth Ticket Rule: रेल्वेने प्रवास करताना अनेकांना लोअर बर्थ सीट हवी असते. मात्र, ही सीट अनेकदा आधीच बुक केलेली असते. दरम्यान, रेल्वेने लोअर बर्थ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत.
Train Lower Berth
Train Lower BerthSaam Tv
Published On
Summary

रेल्वेचा लोअर बर्थसंदर्भात महत्त्वाचा निर्णय

आता लोअर बर्थसाठी दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य

तिकीट बुकिंग करताना मिळणार सुविधा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता रेल्वेत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा व्हावा, यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने लोअर बर्थसंबंधित व्यवस्थेत आणखी बदल केला आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना लोअर बर्थ तिकीट मिळण्यासाठी काही विशेष तरतुदी लागू केल्या आहे.

Train Lower Berth
Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

या नागरिकांना लोअर बर्थसाठी प्राधान्य

भारतीय रेल्वेच्या नवीन नियमानुसार, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांना तिकीट बुक करताना आपोआप लोअर बर्थ दिला जातो. जर लोअर बर्थ तिकीट उपलब्ध असेल तर तुम्हाला विशिष्ट पर्याय न निवडता मिळते. वेगवेगळ्या कोचसाठी वेगवेगळ्या लोअर बर्थसाठी कोटा निश्चित करण्यात आला आहे.

स्लीपर कोच-६ ते ७ लोअर बर्थ

3AC कोच- ४ ते ५ लोअर बर्थ

2AC कोच- ३ ते ४ लोअर बर्थ

हा कोटा ट्रेनमध्ये कोचनुसार लागू केला जातो.

Train Lower Berth
Aadhaar New Rule: 'आधार कार्ड'वर सरकार आणखी मोठा निर्णय घेणार, फोटोकॉपी देण्यावर नियम येणार

दिव्यांग प्रवाशांसाठी आरक्षण कोटा

दिव्यांग प्रवाशांसाठी रेल्वेने सर्व मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी अशा प्रिमियम ट्रेनमध्ये आरक्षण कोटा देण्यात आला आहे.

स्लीपर क्लास- ४ बर्थ (यातील दोन लोअर बर्थ)

2AC/3E- ४ बर्थ (यातील दोन लोअर बर्थ)

2S/CC- 4 सीट

प्रवासादरम्यान जर कोणताही लोअर बर्थ रिकामा असेल तर रेल्वे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी उपलब्ध करुन दिला जातो. जेणेकरुन त्यांना प्रवास करताना आराम मिळावा.

Train Lower Berth
Special Trains : गुड न्यूज! महाराष्ट्रातून धावणार १४ स्पेशल ट्रेन, मुंबई-पुण्यातून किती अन् कोणती ट्रेन धावणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com