देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदाल ठरल्या आहेत. सावित्री जिंदाल यांनी दिग्गज उद्योगपतींना मागे टाकत त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
सावित्री जिंदाल यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी मागे टाकले आहे. २०२३ मध्ये सावित्री जिंदाल यांची संपत्ती वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, सावित्री जिंदाल यांची संपत्ती एका वर्षात ९.६ बिलियन डॉलरने वाढली आहे. त्यांची संपत्ती जवळपास २५ बिलियन डॉलर झाली आहे. त्यांनी विप्रोचे अझजीम प्रेमजी यांना मागे टाकले आहे. त्यांची संपत्ती जवळपास २४ बिलियन डॉलर आहे.
कोण आहेत सावित्री जिंदाल?
सावित्री जिंदल या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. याची स्थापना त्यांचे दिवगंत पती ओमप्रकाश जिंदाल यांनी केली होती. पती ओमप्रकाश जिंदाल यांचे हेलिकॉफ्टर अपघातात निधन झाले होते. त्यानंतर सावित्री यांनी संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी स्विकारली. जिंदाल समूह JSW स्टील, जिंदल स्टील अँड पॉवर,JSW Energy, JSW Saw, जिंदल स्टेनलेस आणि JSW हेडलिंग्ससारख्या कंपन्या चालवतात. सावित्री जिंदाल या १२६ व्या श्रीमंत महिला आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती २७ अब्ज डॉलर आहे.
मुकेश अंबानीच्या संपत्तीत किती वाढ झाली?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५ बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एकूण ९२.३ बिलियन डॉलर्स आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.