Parkinsons Disease: पार्किन्सन्स रुग्णांवर मेडट्रॉनिकने भारतात आणली प्रगत NeuroSmartTM पोर्टेबल MER नेव्हिगेशन यंत्रणा

NeuroSmartTM Portable MER Nevigation: इंडिया मेडट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडने NeuroSmartTM या पार्किन्सन्सच्या उपचारासाठीची भारतातील पहिली पोर्टेबल मायक्रो इलेक्ट्रोड रेकॉर्डिंग (MER) नेव्हिगेशन यंत्रणा बाजारात दाखल केल्याची घोषणा आज केली आहे.
Technology For parkisnson Disease
Technology For parkisnson DiseaseSaam Tv

इंडिया मेडट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडने NeuroSmartTM या पार्किन्सन्सच्या उपचारासाठीची भारतातील पहिली पोर्टेबल मायक्रो इलेक्ट्रोड रेकॉर्डिंग (MER) नेव्हिगेशन यंत्रणा बाजारात दाखल केल्याची घोषणा आज केली आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) ही कंप, ताठरपणा आणि चालायला त्रास होणे यांसह पार्किन्सन्सच्या विविध लक्षणांसाठीची एक उपचारपद्धती आहे. DBS या उपचारपद्धतीमध्ये एक लहानसे पेसमेकरसारखे उपकरण “लीड्स” म्हणून ओळखल्या अत्यंत पातळ वायर्सच्या माध्यमातून मेंदूच्या लक्षणांशी संबंधित नेमक्या भागाला इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठविते. प्रगत DBS इम्प्लान्ट्सची रचना इम्प्लान्ट केलेल्या DBS यंत्रणेचा वापर करून मेंदूचे संदेश पकडण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे. NeuroSmartTM पोर्टेबल MER नेव्हिगेशन यंत्रणा शस्त्रक्रियेदरम्यान अचूकतेमध्ये सुधारणा घडवू आणत DBS (डीप ब्रेन स्टिम्युलेशन) तंत्रज्ञानामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणते.

पार्किन्सन्स आजार हा एक उत्तरोत्तर बळावत जाणारा आजार आहे, ज्यामध्ये हालचालींशी संबंधित उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या समस्यांची तसेच हालचालींव्यतिरिक्तच्या लक्षणांची तीव्रता वाढत जाऊन कालांतराने गंभीर अपंगत्व येते. २०१६ मध्ये जगभरात अंदाजे ६१ लाख लोकांना पार्किन्सन्स आजाराचे निदान झाले. या आजाराच्या रुग्णांचे भारतातील प्रमाण या आजाराच्या एकूण जागतिक भाराच्या १० टक्‍के आहे म्हणजेच त्यांची संख्या ५.८ लाखांच्या घरात आहे.

मेडट्रॉनिक कंपनी १९८७ सालापासून DBS उपचारांच्या क्षेत्रात आघाडीवर राहिली आहे व संपूर्ण जगभरात तिची एकूण १८५,००० DBS उपकरणे बसविण्यात आली आहेत. अल्फा ओमेगा इंजिनीअरिंगने विकसित केलेली NeuroSmartTM पोर्टेबल MER नॅव्हिगेशन यंत्रणा ही न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आजारांच्या उपचारांना एक नवी दिशा देणारी उपचारपद्धती आहे. प्रगत न्यूरोफिजिओलॉजिकल नेव्हिगेशन मॅपिंगचा समावेश असलेल्या या यंत्रणेमुळे न्यूरल अर्थात मज्जातंतूंमधील कार्याची नोंद करताना इलेक्ट्रोड्स अगदी अचूक जागी बसविणे शक्य होते. या यंत्रणेची इप्सित जागा अधिक अचूकपणे निश्चित करण्यासाठीच्या HaGuide ऑटोमॅटिक नेव्हिगेशनवर आधारित प्रगत क्षमतांमुळे रुग्णांसाठी सर्वाधिक परिणामकारक लक्ष्य ओळखण्यास मदत होते, ज्यामुळे लक्षणांपासून जास्तीत-जास्त आराम मिळतो.

फोर्टिस हॉस्पिटल, बेंगळुरू येथील अॅडिशनल डिरेक्टर न्यूरोसर्जरी डॉ. रघुराम जी आणि अॅडिशनल डायरेक्टर न्यूरोलॉजी डॉ. गुरुप्रसाद होसुरकर यांचा समावेश असलेली न्यूरोलॉजी टीम पार्किन्सन्स आजारासाठी हे तंत्रज्ञान वापरणारी पहिली टीम ठरली. ती केस दशकभराहून अधिक काळासाठी पार्किन्सन्सचा सामना करत असलेल्या एका ६८ वर्षीय रुग्णाची होती. या परिस्थितीमुळे रुग्णाच्या हालचालींवर निर्बंध आले होते आणि दैनंदिन कामे करतानाही त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. त्याचबरोबर त्यांची काळजी घेणे हे त्यांच्या कुटुंबासाठीही एक आव्हान बनले होते. सुरुवातीच्या काळात औषधांनी काहीसा आराम मिळाला मात्र कालांतराने ही औषधे नाहीशी झाली. ज्यामुळे या आजाराच्या व्यवस्थापनासाठीच्या पर्यायी उपायांची गरज निर्माण झाली.

Technology For parkisnson Disease
iPhone 16 Features Leaked: iPhone 16 सीरीजमध्ये काय असणार खास? लाँच होण्यापूर्वीच फीचर्स झाले लीक

डॉ. रघुराम म्हणाले, “हे तंत्रज्ञान या क्षेत्राचा चेहरामोहरा पालटून टाकणारे आहे. AI आणि प्रत्यक्ष त्या-त्या वेळी मिळणारा प्रतिसाद यामुळे नव्या MER नेव्हिगेशन यंत्रणेने DBS प्रक्रियेदरम्यान मेंदूच्या आकृतीबंधांना लक्ष्य करण्यासाठीच्या आमच्या कार्यपद्धतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. या प्रगतीमुळे आमच्या अचूकतेने लक्ष्य निर्धारित करण्याच्या क्षमतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे व त्यामुळे आम्हाला आता हे उपचार अभूतपूर्व अचूक होणे शक्य झाले आहे. अशाप्रकारे अधिकाधिक अचूकता साधली गेल्याने अंतिमत: रुग्णांना सुधारित परिणाम प्राप्त होत आहेत व त्यामुळे पार्किन्सन्स आणि मज्जासंस्थेशी संबंधित इतर स्थिती हाताळण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक नवी आशा आणि परिणामकारकता निर्माण झाली आहे.”

डॉ. गुरुप्रसाद होसुरकर म्हणाले, “DBS उपचारपद्धती ही एक परिवर्तन घडवणारी पद्धती आहे, यामुळे हालचालींमध्ये अधिक सुधारणा शक्य होते आणि रुग्णांना नव्याने हालचालींचे स्वातंत्र्य मिळते. नव्या आणि प्रगत, AI सुसज्ज MER नेव्हिगेशन यंत्रणेच्या अचूकतेमुळे इलेक्ट्रोड्स योग्य ठिकाणी बसविण्याच्या प्रक्रियेत अत्यंत काटेकोरपणे इष्टतम जागा शोधली जाते, ज्यामुळे रुग्णांना कंप आणि ताठरपणासारख्या अक्षम बनविणाऱ्या लक्षणांपासून मोठा दिलासा मिळतो.”

Technology For parkisnson Disease
Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याला उतरती कळा, चांदीही दणकून आपटली; वाचा आजचे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com