India Economy: भारताचा नवा विक्रम! जपानला मागे टाकत बनला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

India 4th Largest Economy in World: भारताने एक नवीन विक्रम केला आहे. जपानला मागे टाकत भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारताचा जीडीपी वेगाने वाढत आहे.
India 4th Largest Economy in World
India EconomySaam Tv
Published On
Summary

नवीन वर्षाआधीच भारताची आणखी एक कामगिरी

जपानला मागे टाकत बनला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

२०३० पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल

India overtakes Japan economy: नवीन वर्ष सुरु होण्याआधीच भारताने एक नवा विक्रम केला आहे. भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारताने अर्थव्यवस्थेमध्ये जपानला पाठी टाकले आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

India 4th Largest Economy in World
Gold Rate Today: खुशखबर! आजही सोनं झालं स्वस्त; प्रति तोळा तब्बल ३५०० रूपयांची घसरण; वाचा २२,२४ कॅरेटचे आजचे दर

भारत बनला चौथ्या क्रमांची अर्थव्यवस्था

सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, भारताचा जीडीपी सध्या ४.१८ ट्रिलियन डॉलर आहे. तो सर्वाधिक जास्त आहे. यामुळे भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढील चार वर्षात म्हणजेच २०३० मध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये जर्मनीलादेखील पाठी टाकेल, असं सांगण्यात येत आहे. २०३० मध्ये जर्मनीला मागे टाकून भारत हा अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकवेल. भारत सर्वात मोठा तिसरा आर्थिक महासत्ता असलेला देश बनले.

देशांतर्गत वापर आणि मजबूत संरचनात्मक सुधारणांमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहिली आहे. २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाही भारताचा जीडीपी हा ८.२ टक्क्यांनी वाढला. हा जीडीपी पहिल्या सहामाहिती ७.८ टक्के होते. मागील वर्षात ७.४ टक्के होता. जागतिक व्यापारात अनिश्चितता असूनही ही मागच्या तिमाहीतील सर्वात जलद वाढणारा जीडीपी आहे.

२०३० पर्यंत आणखी प्रगती करणार

सरकारने असा विश्वास व्यक्त केला आहे की, २०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७.३ ट्रिलियन होईल. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन दुसऱ्या स्थानावर तर जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे.

India 4th Largest Economy in World
America: जगाला टॅरिफचा धसका दाखवणारे ट्रम्पच अडचणीत, अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर, Moody's चा दावा

जागतिक संस्थांना वाढ अपेक्षित

आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या विकासाबद्दल आशा व्यक्त केली आहे. जागतिक बँकेने २०२६ पर्यंत भारताचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मूडीजच्या रिपोर्टनुसार, भारत जी २० देशांमध्ये सर्वाधित वेगाने वाढणारी अर्थवस्था बनेल. २०२६ मध्ये ६.४ टक्के तर २०२७ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढेल.

India 4th Largest Economy in World
Indigo आणि Air India मध्ये पायलटसाठी भरती; नुसता बोनसच ५० लाखांचा, तरीही वैमानिकांची ऑउटगोइंग सुरूच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com