Flight Ticket Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त Vistara एअरलाइन्सची खास ऑफर; फक्त १५७८ रुपयांमध्ये विमान प्रवासाची संधी

Vistara Airline Flight Ticket Offer: स्वातंत्र्यदिनानित्त तुम्हाला विमानाने कमी खर्चात प्रवास करण्यास खास ऑफर आहे. तुम्ही ३१ ऑक्टोबरपर्यंतचे फ्लाइट तिकीट कमी रुपयांत बुक करु शकतात.
Flight Ticket Offer
Flight Ticket OfferSaam Tv
Published On

उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या वर्षी १५ ऑगस्ट गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी १ दिवस ऑफिस आणि त्यानंतर दोन दिवस वीकेंड आले आहेत.या लाँग वीकेंडसाठी तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कर असाल तर तुमच्यासाठी फ्लाइट तिकीट तुम्हाला खूप कमी किंमतीत मिळणार आहे. Vistara एअरलाइन्सने १५ ऑगस्टनिमित्त ही खास ऑफर दिली आहे.

Flight Ticket Offer
Government Schemes For Girls: मुलींसाठी सरकारच्या खास योजना! शिक्षणापासून ते लग्नापर्यंत मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

Vistara च्या ऑफरमध्ये जर तुम्ही १५ ऑगस्टपर्यंत फ्लाइट तिकीट बुक केले तर तु्म्हाला सूट मिळणार आहे. तुम्ही ३१ ऑक्टोबपर्यंत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही तुमच्यासाठ सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही या कालावधीमध्ये फिरायला जात असाल तर तुम्हाला फक्त १,५७८ रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट मिळणार आहे. ही ऑफर इकोनॉमी, प्रिमियम इकोनॉमी आणि बिझनेस क्लासवर लागू होणर आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या फेस्टिव्हल सेलमध्ये देशाअंतर्गत प्रवास करण्यासाठ इकोनॉमी क्लासमध्ये १,५७८ रुपये तिकीट असणार आहे तर प्रिमियम इकोनॉमी क्लाससाठी २६७८ रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ९,९७८ रुपये तिकीट असणार आहे.

Flight Ticket Offer
Petrol Diesel Price Today: मुंबई, पुण्यात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Vistara ची ही ऑफर इंटरनॅशनल फ्लाइट तिकीटवरदेखील देण्यात आली आहे. ज्यात इकोनॉमी क्लासची तिकीट ११,९७८ रुपये, प्रिमियम इकोनॉमी क्लासची तिकीट १३,९८७ रुपये तर बिझनेस क्लासची तिकीट ४६,९७ रुपयांपासून सुरु होणार आहे. Vistara फ्लाइटचा हा सेल १५ ऑगस्ट २०२४ पर्यंतच असणार आहे.

Flight Ticket Offer
आकर्षक लूक, दमदार इंजिन अन् नवीन स्टाईलसह Royal Enfield Classic 350 मार्केट करणार जाम! किती असेल किंमत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com