खुशखबर! ICICI बँकेने मिनिमम बँलेंसची लिमिट घटवली, आता अकाउंटमध्ये एवढे पैसे ठेवावे लागणार

ICICI Bank Minimum Balance Limit Decreases: आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना दिलासा दिला आहे. आता बँकेने मिनिमम बँलेसची लिमिट कमी केली आहे.
 ICICI
ICICISaam Tv
Published On

देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील आयसीआयसीआय बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने मिनिमम बँलेसच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता मिनिमम बँलेसची लिमिट कमी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय बँकेने किमान बँलेंस ठेवण्यासाठी अट ५०,००० रुपये केली होती. त्यानंतर आता ही लिमिट कमी करण्यात आली आहे. आता मिनिमम बँलेंस ठेवण्याची लिमिट १५००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

 ICICI
HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल! ग्राहकांच्या खिशावर परिणाम

ICICI बँकेचा मोठा निर्णय

आता सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील बँकेत तुम्हाला कमीत कमी ७५०० किंवा २,५००० रुपये ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, बँकेने मागील आठवड्यात मिनिमम बँलेस ठेवण्याची लिमिट ५०,००० रुपये केली होती. त्यानंतर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बँकेने आता पुन्हा किमान बँलेस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या खात्यांना लागू होणार नाही नियम

बँकेने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा बदल सॅलरी अकाउंट, ज्येष्ठ नागरिक पेन्सनधारक, बेसिक बँकिंग सेव्हिंग डिपॉझिट अकाउंट, जन धन खाती यासाठी लागू होणार नाही. तसेच ६० वर्षांखालील पेन्सनधारक आणि काही विद्यार्थ्यांना या किमान शिल्लक रक्कमेच्या अटीमधून सूट देण्यात आली आहे.

 ICICI
Ladki Bahin Yojana Scheme : निवडणुकीपूर्वी पात्र, आता अपात्र कसं? लाडक्या बहिणीचा सरकारला संतप्त सवाल

किमान रक्कम न ठेवल्यास आकारला जाणार दंड

नवीन नियमांनुसार, जर तुम्ही खात्यात किमान १५०० रुपये ठेवले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. जेवढी रक्कम कमी तेवढे ६ टक्के किंवा ५०० रुपये दंड आकारला जाईल.

याआधी बचत खात्यासाठी किमान शिल्लक (MAMB) रक्कम १०,००० रुपये ठेवावी लागायची. अलीकडेच, बँकेने शहरी ग्राहकांसाठी ती लिमिट ५०,००० केली होती. त्यानंतर आता पुन्हा कमी केली आहे. अरध-शहरी शाखांसाठी ही रक्कम ५००० रुपयांवरुन २५००० रुपये करण्यात आली, ग्रामीण शाखांसाठी किमान रक्कम ५००० वरुन १०,००० रुपये करण्यात आली आहे.

 ICICI
Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com