
आयसीआयसीआय बँकेनं किमान शिल्लक मर्यादा ५०,००० रुपये केली
१ ऑगस्ट २०२५ पासूनच्या नव्या खात्यांवर हा नियम लागू होईल.
नियम न पाळल्यास खातेदारांना दंड आकारणार
ICICI Bank minimum balance rule 2025 for new savings accounts : देशातील सर्वात मोठी खासगी बँक आयसीआयसीआयने महानगर, शहरी आणि ग्रामीण भागात बचत खात्यातील किमान शिल्लक रकमेची मर्यादा वाढवून ५० हजार रुपये केली आहे. याआधी किमान शिल्लक रकमेची मर्यादा १० हजार रुपये होती. १ ऑगस्ट २०२५ पासूनच्या नव्या अकाउंट्ससाठी हा नियम लागू होणार आहे.
डोमेस्टिक बँकांमधील खात्यांमध्ये किमान शिल्लक रकमेची मर्यादा सर्वाधिक आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २०२० मध्ये किमान शिल्लक रकमेचा नियम संपुष्टात आणला होता. बहुतांशी बँकांकडून डे-टू-डे ऑपरेशन्स आणि इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्यात यावी, असं सांगण्यात येतं. ग्राहकांच्या खात्यातील मिनिमम बॅलेन्स या मर्यादेपेक्षा कमी झालं तर दंडात्मक शुल्क आकारलं जातं. मात्र, इतर बँकांमध्ये ही मर्यादा साधारणपणे २००० ते १०००० रुपये इतकी असते.
आयसीआयसीआयनं निम्न शहरी शाखांमध्ये किमान बॅलेन्स ५ हजार रुपयांनी वाढवून २५ हजार रुपये आणि ग्रामीण भागातील शाखांमध्ये २५०० रुपयांनी वाढवून १० हजार रुपये केली आहे. एचडीएफसी बँकेबाबत सांगायचं झालं तर, मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये किमान बॅलेन्स १० हजार रुपये, सेमी अर्बनमध्ये ५००० रुपये आणि ग्रामीण भागात २५०० रुपये इतकी मर्यादा आहे.
आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक तत्वांनुसार, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट्स आणि प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत (PMJDY) सुरू केलेल्या खात्यांमध्ये किमान बॅलेन्सची आवश्यकता नाही. मात्र, इतर खात्यांसाठी बँकेकडून आपापल्या धोरणानुसार सेवा शुल्क आकारले जाऊ शकते.
दरम्यान, किमान शिल्लक रकमेची मर्यादा न पाळल्यास बँकेकडून खातेदारांना दंड आकारण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.