Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

IAS Abdul Nasar Success Story: बालपण अनाथाश्रमात गेले, खर्च भागवण्यासाठी वेटर ते डिलिव्हरी बॉयपर्यंत काम केले. सरकारी नोकरी मिळवली. त्यात प्रमोशन मिळवून आयएएस ऑफिसर झाले.
IAS Abdul Nasar
IAS Abdul NasarSaam Tv
Published On

स्वप्न पाहिल्यावर ती नेहमी पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकदा स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात अनेकदा खूप अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु या काळातदेखील जे लोक मेहनत करतात ते नक्कीच यशस्वी होतात. असंच यश आयएएस बी अब्दुल नासर यांना मिळालं आहे.

अब्दुल नासर यांनी खूप खडतर परिस्थितीतून आपले स्वप्न पू्र्ण केले.त्यांचे लहानपण अनाथ आश्रमात गेले. या परिस्थितीत त्यांनी खर्च भागवण्यासाठी नोकरीदेखील केली. (IAS Success Story)

IAS Abdul Nasar
Success Story: MBA करुन बेरोजगार, रद्दीच्या पेपरचा ढीग पाहून सुचली 'आयडिया'; पूनम गुप्ता आज ८०० कोटींच्या मालकीण

आयएएस ऑफिसर बी. अब्दुल नासर यांचे वडील ते पाच वर्षांचे असतानाच गेले. त्यानंतर अब्दुल आणि त्यांचे भाऊ-बहीण अनाथाश्रमात वाढले.त्यांनी केरळच्या विविध अनाथाश्रमात राहून बालपण काढले. त्यांनी तिथूनच शिक्षण पूर्ण केले. ते १० वर्षांचे असतानाच त्यांनी हॉटेलमध्ये साफ-सफाई, डिलिवरी बॉयचे काम केले.

या परिस्थितीतही त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण केले. त्यानंतर थालास्सेरीच्या सरकारी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. या काळात त्यांनी ट्यूशन टीचर, फोन ऑपरेटर, वर्तमानपत्र घरोघरी पोहचवण्याचेदेखील काम केले. (IAS B Abdul Nasar Success Story)

IAS Abdul Nasar
Success Story: लहानपणी म्हशी राखल्या, बारावीतच लग्नासाठी दबाव, पण जिद्दीनं क्रॅक केली UPSC; आज सी वनमथी आहेत IAS ऑफिसर

१९९४ साली त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. या काळात त्यांनी केरळच्या स्वास्थ्य विभागात नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी राज्य सिविल परीक्षा पास देऊन डेप्युटी कलेक्टर झाले. २०१५ मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ डेप्युटी कलेक्टर म्हणून घोषित करण्यात आले होते.

२०१७ साली अब्दुल नासर यांचे प्रमोशन झाले. त्यांना IAS अधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी केरळ सरकारच्या आवास आयुक्त म्हणून काम केले. २०१९ मध्ये ते कोल्लम जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणून नियुक्त झाले. (UPSC Success Story)

IAS Abdul Nasar
Success Story: भावांचा नाद खुळा! मातीशिवाय घरातच उगवले 'केशर'अन् सुरू केला व्यवसाय; आज कमावतात लाखो रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com