EPF Balance : आता WhatsApp वर एका क्लिकवर समजणार पीएफ बॅलन्स! EPFO ने आणली एकदम सोपी ट्रिक

EPFO WhatsApp number : पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी आता UAN पोर्टलवर लॉगिन करण्याची गरज नाही, असा दावा केला जात आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पीएफ बॅलन्स, पासबुक आणि शेवटचे पाच व्यवहार पाहण्याची सुविधा कशी वापरायची?
How to Check EPF Balance and Passbook Details Through WhatsApp
EPFO WhatsApp Service for PF Balance CheckSaam TV marathi
Published On: 

How to check PF balance online : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी एक अत्यंत सोयीची आणि महत्त्वाची सेवा सुरू केली आहे. आता पीएफ बॅलन्स किंवा पासबुक तपासण्यासाठी कोणतीही किचकट प्रक्रिया करण्याची अथवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) पोर्टलवर वारंवार लॉगिन करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या थेट व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) माध्यमातून तुमच्या पीएफ खात्याची (PF balance check by mobile) सर्व माहिती सेकंदात मिळवू शकता. नोकरदारांचा वेळ वाचावा आणि त्यांना डिजिटल सेवा अधिक सुलभ वाटावी, यासाठी ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. (EPF passbook download, UAN balance check)

EPFO ने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पीएफ बॅलन्स, पासबुक आणि शेवटचे ५ ट्रान्झॅक्शन तपासण्याची नवीन सुविधा सुरू केली आहे. ईपीएफ (EPF) सदस्यांना कोणत्याही EPFO ऑफिसमध्ये (EPFO WhatsApp number) जाण्याची गरज नाही. अथवा वारंवार ऑनलाइन पोर्टलवरून UAN नंबर टाकून बॅलेन्स अथवा इतर माहिती तपासण्याची गरज उरली नाही. ईपीएफओ सदस्या घरबसल्या मोबाईलवरच खात्याची सर्व माहिती सेकंदात मिळवू शकतात. त्यासाठी काय करावे लागेल? अगदी सोपी पद्धत जाणून घेऊयात.. (EPF last five transactions)

How to Check EPF Balance and Passbook Details Through WhatsApp
Mahalakshmi Express : मध्यरात्री थरार! महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; महिलांचे सोन्याचे दागिने लुटले

व्हॉट्सॲपवर पीएफ बॅलन्स कसा तपासावा

  • तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप उघडा आणि तुमच्या UAN-नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून +91 8796441800 वर "Hi" किंवा "Hello" असा मेसेज पाठवा

  • चॅटबॉट तुम्हाला तुमची भाषा निवडायला सांगेल. हिंदी, इंग्रजी किंवा तुमच्या पसंतीची भाषा निवडा.

  • स्क्रीनवर पीएफ बॅलन्स, शेवटचे ५ व्यवहार आणि पासबुक यांसारखे पर्याय दिसतील. तुमचा पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी 'बॅलन्स तपासा' निवडा.

  • तुमची ओळख पडताळण्यासाठी तुम्हाला ओटीपी विचारला जाईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करा.

  • पडताळणीनंतर उपलब्ध पीएफ खाते किंवा सदस्य आयडी निवडा. तुमच्या खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील स्क्रीनवर दाखवले जातील.

How to Check EPF Balance and Passbook Details Through WhatsApp
धडकी भरवणारी दुर्घटना! अमेरिकेत थेट शहरात क्षेपणास्त्रासारखं कोसळलं विमान; सर्व प्रवाशांचा मृत्यू;थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल

पीएफ बॅलेन्स तपासण्याआधी खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • तुमचा मोबाईल नंबर UAN सह नोंदणीकृत असावा.

  • ओटीपी पडताळणी आवश्यक असू शकते.

  • तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असल्यास, एकापेक्षा जास्त सदस्य आयडी दिसू शकतात.

  • फक्त EPFO ​​चा सत्यापित व्हॉट्सॲप नंबर वापरा.

  • ओटीपी, यूएएन पासवर्ड किंवा बँकेचा तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.

पीएफच्या कोणत्या ३ सुविधा व्हॉट्सॲपवर उपलब्ध

ईपीएफओच्या नवीन व्हॉट्सॲप सेवेअंतर्गत कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळतील. ईपीएफओ सदस्यांना पीएफ खात्यात जमा झालेली एकूण रक्कम पाहता येईल. यामुळे त्यांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम ठरवणे सोपे जाईल.

कर्मचारी त्यांच्या खात्याच्या पासबुकची माहिती थेट व्हॉट्सॲपवर पाहू शकतील. यामुळे त्यांना पीएफ खात्यातील जमा रकमेची नोंद समजण्यास मदत होईल.

कर्मचारी त्यांच्या खात्यातील नवीनतम पाच व्यवहार पाहू शकतील. यामुळे कंपनीचे पीएफ योगदान जमा झाले आहे की नाही हे ठरवणे सोपे होईल. त्याशिवाय ही सेवा पीएमव्हीबीआरवाय (PMVBRY) योजनेशी संबंधित आवश्यकता पूर्ण करण्यासाठी देखील मदत करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.