भारतात नागरिकांसाठी रेल्वेला खूप महत्व आहे. रेल्वे स्टेशनवर आपल्याला नेहमी गर्दी पाहायला मिळते. रेल्वेच्या या धावपळीत सर्वांनाच लवकर वेळेत पोहचायचं असतं. स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी नागरिक नेहमी रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. कारण रेल्वेने प्रवास करणे हे सर्व नागरिकांसाठी खूप सोयीस्कर असते. रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागते.
सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात सर्वच प्रवाशांना घरी गावी जायचे असते. त्यासाठी सर्व लोक तिकिट बुक करण्यासाठी ऑनलाइन माध्यम निवडतात. त्यामुळे नागरिकांच्या या मागणीमुळे तिकिट मिळणे आणखी कठीण होत जाते. त्यामुळे सर्व नागरिक आधीच तिकिटे काढायला सुरुवात करतात. प्रवास करताना नागरिकांसाठी रेल्वेमध्ये कन्फर्म सीट मिळवणे खूप अवघड असते. मात्र अनेकदा कन्फर्म तिकिट न मिळाल्यामुळे प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होते. त्यामुळे नागरिक बऱ्याचदा गावी जायचे प्लान कॅन्सल करताना पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत नागरिक वेगवेगळ्या अॅपचा वापर करतात. नागरिकांच्या या मागणीसाठी तुम्ही तत्काळ तिकिट बुकिंगचा पर्याय निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमचे गावी जायचे प्लान कॅन्सल करावे लागणार नाही. पण कधी कधी तत्तकाळ तिकिट बुकिंग करुन ही आपल्याला कन्फर्म सीट मिळेल असे नाही. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल पाहायला मिळतात. पण आता तुम्हाला अशा काही ट्रिक समजणार आहे , ज्यामुळे तुम्हाला ट्रेनचे कन्फर्म तिकिट मिळेल.
सुट्टी आणि सणासुदीच्या काळात गावी जायचा अचानक प्लान ठरला तर , तुम्ही रेल्वे तिकिट अॅप द्वारे तत्काळ तिकिट बुकिंग करु शकता. त्यासाठी तुम्हाला बुकिंग अॅपवर एक दिवस अगोदर लॅाग इन करावे लागेल. त्यामुळे तुमची बुकिंग आधी झालेली असेल. तिकिट बुक करताना नेहमी तारखा बघून बुक करा. त्यामुळे तुमच्या प्रवासाच्या वेळी तुम्हाला कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर प्रवाशांसाठी IRCTC हा अॅपद्वारे तुम्ही काढू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेचच तत्तकाळ तिकिट बुक करु शकता. तिकिट बुक करताना आधीच सगळ्या गोष्टीचीं माहिती ठेवा. ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. तिकिट बुक झाल्यास नागरिक UPI,नेट बॅंकिग, आणि मोबाईल वॅालेट द्वारे पेंमट करु शकता.
IRCTC अॅप द्वारे बुक करा रेल्वे तिकिट, स्टेप बाय स्टेप पद्धत
1) नागरिकांसाठी हा अॅप खूप उपयुक्त असल्याने नागरिक या अॅपचा वापर तत्तकाळ बुकिंगसाठी करावा.
2) सर्व प्रथम IRCTC हा अॅप डाउनलोड करा. त्यानंतर अॅप ओपन करुन Register या पर्यावर किल्क करा.
3) संपूर्ण माहिती भरुन LOGIN आणि EMAILID सह मोबाईल नंबर प्रविष्ठ करा. यानंतर तुमचा IRCTC आयडी तयार होईल.
4) मोबाईल अॅपवरुन युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे LOGIN ओपन करावे लागेल.
5) JOURNEY THROUGH TRAIN TICKETING वर क्लिक करुन प्रवासाची तारीख आणि ट्रेनची माहिती भरा.
6) प्रवासी वर्ग निवडून ट्रेनचा पर्याय निवडा. BOOK NOW या पर्यायावर क्लिक करुन तुमचे ऑनलाईन बूकिंग कन्फर्म होईल.
7) UPI,नेट बॅंकिग, आणि मोबाईल वॅालेट द्वारे ऑनलाईन मोडमध्ये तिकिट बुकिंगसाठी पेंमट करा.
8) तिकिट यशस्वीरित्या बुक झाल्यावर तुम्हाला त्याचा एसमेस तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर उपलब्ध होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.