Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Home Buying Tips: घर खरेदी करण्यासाठी अनेकजण होम लोन घेतात. घर खरेदी करताना तुम्ही होम लोनवरील व्याजदर वाचवू शकतात. यासाठी ही सोपी ट्रिक वापरा.
Home Loan
Home LoanSaam Tv
Published On
Summary

घर खरेदी करण्याआधी ही माहिती वाचा

लोनवरील व्याजदर कमी करायचंय? हे कॅल्क्युलेशन वाचा

होम लोनवरील व्याज कमी करण्यासाठी ट्रिक

स्वतः चे हक्काचे घर खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सध्या मुंबई पुण्यासारख्या शहरात घर खरेदी करणे म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजण लोन काढून घर खरेदी करतात. लोन काढून दर महिन्याला ईएमआय भरतात. परंतु यावर खूप जास्त व्याज लागते. अशा परिस्थितीत काही ट्रिक वापरुन होम लोनचा कालावधी कमी करु शकतात. याबाबत टॅक्सबडीचे फाउंडर सुजीत बांगर यांनी एक लिंक्डइन पोस्ट केली आहे.

Home Loan
Home Loan: फ्लॅटच्या ताब्यावरून 'सर्वोच्च' निर्देश, बिल्डरच्या मनमानीला चाप बसणार?

होम लोनचं कॅलक्युलेशन (Home Loan Calculation)

सुजीत बांगर यांनी लोन कमी करण्याची एक ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक वापरुन तुम्ही १९ लाखांपर्यंत होम लोनवर व्याज कमी करु शकतात. तुम्ही हे लोन फक्त ६ वर्षात भरु शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून एकही रुपया देण्याची गरज नाही. तुम्ही होम लोन ओवरड्राफ्टद्वारे लोन भरु शकतात.

बांगर यांनी लिंक्डइनवर पोस्ट करत सांगितले की, सुरेश आणि रमेशची गोष्ट त्यांनी सांगितले. दोघांचेही ६० लाखांचे लोन होते. दोघांनी लोन भरण्यासाठी वेगवेगळे मार्ग स्विकारले. रमेशने सामान्य पद्धतीने लोन भरले. त्याने आपल्या बँकेत ८ लाख रुपये ठेवले. त्यावर खूप कमी व्याजदर मिळत होते. परंतु लोनच्या व्याजाचे ते संपूर्ण पैसे भरत होते. रमेश यांनी २० वर्षात ६५ लाखांचे लोन भरले.

Home Loan
Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

व्याजावर १९.२५ लाख वाचवले

दुसरीकडे सुरेश यांनी होम लोन ओडी किंवा सुपर सेवर अकाउंटची निवड केली. त्यांनी आपले ८ लाख रुपये ओव्हरड्राफ्ट लिंक्ड लोन अकाउंटमध्ये जमा केले. यामुळे लोनवरील मूळ रक्कम ५२ लाखांवर येईल. त्यांचा ईएमआय तोच राहिला. परंतु कर्जावरील व्याजदर कमी होत गेले. याचसोबत त्यांना सेव्हिंगवर ९ टक्के परतावा मिळाला.

सुरेशने १ वर्षांपेक्षा कमी कालावधीत कर्ज फेडले. तसेच त्यांनी व्याजात १९.२५ लाख रुपये वाचवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे वाचवलेले पैसे कधीही काढू शकतात.

Home Loan
CIDCO Homes : दोन लाखांनी घरे स्वस्त होणार, निवडणुकीआधी सरकार घेणार मोठा निर्णय? सिडकोची आज महत्त्वाची बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com