HDFC Bank UPI Service: HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ४ ऑगस्टला राहणार UPI सेवा बंद

HDFC Bank UPI Service Unavailable On 4th August 2024: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेचे यूपीआय पेमेंट उद्या म्हणजे ४ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे.
HDFC Bank UPI Service
HDFC Bank UPI ServiceSaam Tv
Published On

सध्या सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करतात. यामध्ये UPI ट्रान्झॅक्शन करण्यावर ग्राहक जास्त भर देताना दिसत आहे. सर्वसामान्य लोक अगदी प्रत्येक गोष्ट खरेदीसाठी यूपीआयचा वापर करतात. दरम्यान, उद्या म्हणजेच ४ ऑगस्टला एचडीएफसी बँकांचे यूपीआय पेमेंट सेवा (HDFC Bank UPI Payment) बंद राहणार आहे.

HDFC Bank UPI Service
ITR Filling: ३१ जुलैपूर्वी ITR फाइल करु शकला नाहीत? होऊ शकतो तुरुंगवास; जाणून घ्या सविस्तर

एचडीएफसी बँकेने डाउनटाइम अलर्ट जारी केले आहे. त्यामुळे उद्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना यूपीआय पेमेंट करता येणार आहे. बँकेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, १२ ते ३ वाजेपर्यंत युपीआय सेवा बंद राहणार आहे. या कालावधीत सिस्टिम मेंटनेंसचे काम होणार आहे. यादरम्यान ऑनलाइन पेमेंट सेवा बंद राहणार आहे. ३ तास ही सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे एचडीएफसी बँक खातेधारकांनी आजच एटीएममधून पैसे काढून ठेवा.या कालावधीत सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट या दोन्ही खातेधारकांना व्यव्हार करता येणार नाही. (HDFC Bank UPI Payment Will Unavailable On 4th August)

HDFC Bank UPI Service
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

एचडीएफसीच्या या सर्व्हिसचा परिणाम इतर अनेक अॅप्सवर पडणार आहे.यात HDFC Mobile Banking App, Gpay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobiknwik या अॅप्सचा समावेश आहे.POS च्या मदतीने होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

HDFC Bank UPI Service
Ransomware Attack On Banks: ३०० बँकांची UPI, ATM सेवा तात्पुरती बंद; सर्व्हरमध्ये घुसला व्हायरस; तुमचं UPI पेमेंट सुरु आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com