HDFC बँकेचा मोठा निर्णय! MCLR मध्ये कपात; आता कर्जावरील EMI होणार कमी

HDFC Bank Decrease MCLR Rate: एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या एमसीएलआर रेटमध्ये कपात केली आहे.
HDFC
HDFCSaam Tv
Published On

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने काल म्हणजे ७ मे २०२५ रोजी MCLR मध्ये कपात केली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR रेटमध्ये ०.१० ते ०.१५ टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे कर्जावरील व्याजदरावर परिणाम होणार आहे.

HDFC
Government Scheme: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात १२००० रुपये; कसं? योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

एचडीएफसी बँकेने एमसीएलआर रेट कमी केल्याने होम लोन, कार लोन आणि वैयक्तिक लोनवरील EMI कमी होणार आहे. रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये दोनदा कपात केली आहे. यानंतरच एचडीएफसी बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेसोबत इतर अनेक बँकांनीदेखील एमसीएलआरमध्ये कपात केली आहे.

MCLR म्हणजे नक्की काय?

प्रत्येक बँक आपला MCLR रेट निश्चित करते. MCLR वर आधारित होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोनवरील व्याजदर निश्चित होते. आता एमसीएलआरमध्ये कपात झाल्यावर कर्जावरील व्याजदरदेखील आपोआप कमी होणार आहे. बँकेने एमसीएलआर रेटमध्ये ०.१० ते ०.१५ टक्के कपात केली आहे.

HDFC
Bank Of Baroda Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदात निघाली भरती; पगार ३७००० रुपये; आजच अर्ज करा

नवीन MCLR रेट

ओव्हरनाइटसाठी ९ टक्के नवीन MCLR रेट निश्चित करण्यात आले आहे. हा दर आधा ९.१० टक्के होता. एका महिन्यासाठीदेखील ९ टक्के MCLR रेट असणार आहे. तीन महिन्यासाठी ९.०५ टक्के तर ६ महिन्यासाठी ९.१५ टक्के दर असणार आहे. यामध्ये ०.१५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. १ वर्षासाठी ९.१५ टक्के तर २ आणि ३ वर्षांसाठी ९.२० टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ०.१५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर एचडीएफसी बँकेने हा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यावर प्रत्येका बँका आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात करतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकंना मात्र, फायजा होणार आहे.

HDFC
Repo Rate: RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर ३ बँकांचा मोठा निर्णय! कर्जावरील व्याजदरात केली कपात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com