HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का, गृहकर्जाचे व्याजदर इतक्या टक्क्यांनी वाढवले

HDFC Bank Home Loan: केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीपूर्वीच एचडीएफसी (HDFC) बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.
HDFC Bank
HDFC BankGoogle

HDFC Bank Home Loan:

केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीपूर्वीच एचडीएफसी (HDFC) बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या रेपो-लिंक्ड गृहकर्जाच्या व्याजदरात 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या वाढीमुळे व्याजदर 8.70 ते 9.8 टक्के इतका झाला आहे.

1 ऑक्टोबर 2019 नंतर मंजूर केलेली सर्व किरकोळ कर्जे एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेली आहेत. बहुतेक बँकांच्या बाबतीत हा बेंचमार्क रेपो रेटआहे. एचडीएफसी लिमिटेडचे ​​आता एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

HDFC Bank
Ather Energy: सर्वात मोठी सीट, वॉटरप्रूफ, पॉवरफुल बॅटरी! Ather च्या नवीन Electric Scooter ची बुकिंग सुरू

याचबद्दल माहिती देताना मॉर्टगेज वर्ल्डचे संस्थापक विपुल पटेल म्हणाले, "एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाआधी एचडीएफसी 8.30 ते 8.45 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत होती. विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक पोर्टफोलिओ स्तरावर गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करत आहे. त्याचा वाढता खर्च हे यामागचे कारण आहे.  (Latest Marathi News)

आयसीआयसीआय बँकेचे सध्याचे गृहकर्ज व्याजदर 9 टक्के ते 10.05 टक्के दरम्यान आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृहकर्ज दर 9.15 टक्के ते कमाल 10.05 टक्के आहेत. तसेच ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.75 ते 9.65 टक्के पर्यंत गृहकर्जावरील तुलनेने कमी व्याजदर देत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जाचा प्रारंभिक व्याजदर 8.70 टक्के आहे.

HDFC Bank
New Rules: क्रेडिट कार्डपासून ते फास्टॅगच्या नियमांपर्यंत, 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

दरम्यान, आरबीआयने नवीन आर्थिक वर्षासाठी (2024-25) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) द्वि-मासिक बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिली बैठक 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे. पुढील बैठक 5 जून रोजी सुरू होईल. तर आर्थिक आढावा 7 जून रोजी जाहीर केला जाईल. यानंतर पुढील बैठक 6 ते 8 ऑगस्ट, त्यानंतर 7 ते 9 ऑक्टोबर, त्यानंतर 4 ते 6 डिसेंबर आणि शेवटची बैठक फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com