GST Rates: मोठी बातमी! १०० वस्तूंवरील GST दर कमी होण्याची शक्यता, मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा

GST Rates Will Be Decrease On 100 Items: सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुलभूत गोष्टींवरील जीएसटी दरात कपात केली जाऊ शकते. जवळपास १०० वस्तूंवरील जीएसटी दर ५ टक्क्यांपर्यंत येऊ शकतो.
GST Rates
GST RatesSaam Tv
Published On

सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. जीएसटी दर निश्चिती मंत्रिगटाच्या बैठकीत ही चर्चा झाली आहे. जवळपास १०० हून अधिक वस्तूंवरील कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के केला जाऊ शकतो. जर जीएसटी दर कमी झाला तर सर्वसामान्य लोकांना दिसला मिळणार आहे. (GST Rates)

GST Rates
Modi Government Schemes: हक्काचे घर ते अपघात विमा; मोदी सरकारच्या या ६ योजना माहित आहेत का?

जीएसटी दर निश्चितीसंदर्भात मंत्रिगटाच्या सहा सदस्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत बाईक, सायकल, बाटलीबंद पानी, वैद्यकीय गौष्टी तसेच औषधांच्या जीएसटी दरात कपात करण्याबाबत चर्चा झाली आहे. जीएसटी दरात कमी केल्याने महसुलला फटका बसणार आहे.

काही गोष्टींवरील कर वाढवण्यात येणार असल्याची शक्यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. सध्या जीएसटीमध्ये ५,१२, १८ आणि २८ असे ४ टप्पे आहेत. हे दर ४० टक्क्यांपर्यंत आकारले जाऊ शकतात. (GST Rates Decrease)

GST Rates
Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

जीएसटीअंतर्गत असलेला सरासरी कर या वर्षीत ११.५६ टक्क्यांवर आला आहे. सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत वस्तूंवर जीएसटी ५ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. दरम्यान सौंदर्य उपकरणे,हेअर ड्रायर, हेअर डाय अशा अनेक गोष्टींवरील कर २८ टक्क्यांपर्यंत नेण्यात येईल, असं चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत सायकलींवरचा कर ५ टक्क्यांपर्यंत करण्याची शक्यता आहे.

जीएसटी दरांमध्ये बदलांबाबत मंत्रिगट निर्णय घेईल. यात काही वस्तूंवरील जीएसटी दर कमी होईल.तर काही लक्झरी वस्तूंवरील दर वाढवण्यात येईल. मात्र, मूलभूत गोष्टींवर दर कमी केल्याने नागरिकांना फायदा होणार आहे.

GST Rates
PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com