GST Council Meet: ऑनलाइन गेमिंग संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! आता कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून भरावा लागेल 28 टक्के जीएसटी

GST Council Meeting Updates: ऑनलाइन गेमिंग संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! आता कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून भरावा लागेल 28 टक्के जीएसटी
GST Council Meeting Updates
GST Council Meeting Updatessaam tv
Published On

GST Council Meeting Updates: ऑनलाइन गेमिंगवर लवकरच आता जीएसटी आकारण्यात येणार आहे. बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, या पावसाळी अधिवेशनात जीएसटी कायदा (दुरुस्ती) संसदेत मांडला जाईल. त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होऊ शकते.

सीतारामन यांनी माहिती दिली की, जीएसटी परिषदेने मान्य केले आहे की, ऑनलाइन गेमिंगवरील नियम लागू झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर त्यावर विचार केला जाईल. नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो यांना २८ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.

GST Council Meeting Updates
Share Market Closing: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान...

पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या मंत्र्यांनी ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. मात्र गेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांची इच्छा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

6 महिन्यांनंतर बदल होऊ शकतात

पत्रकार परिषदेदरम्यान महसूल सचिव म्हणाले, “६ महिन्यांनंतर ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवरील २८ टक्के जीएसटीच्या कर दरामध्ये काही बदल जाणवला तर तो अधिसूचनेद्वारे केला जाईल. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता नसणार.''

GST Council Meeting Updates
Shaikshanik Karj Yojana: परदेशात शिक्षण घ्यायचं आहे? महाराष्ट्र सरकार देतेय 20 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे योजना...

पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कॅसिनोवर जीएसटी एंट्री लेव्हलवर लावला जाईल. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, समजा कॅसिनोचे प्रवेश शुल्क 1000 रुपये आहे. आत जाऊन तुम्ही 100 रुपयांच्या गेममध्ये 300 रुपये जिंकता. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त 1000 रुपयांवर जीएसटी भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com