Gold Silver Rate (29th December 2023): सोन्याचा भाव गडगडला, चांदी १२०० रुपयांनी घसरली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (29th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: मागच्या सहा दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसून आली आहे. मागच्या तीन आठवड्यानंतर काल सोने उच्चांकी भावावर पोहोचले होते. आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे
Gold Silver Rate (29th December 2023)
Gold Silver Rate (29th December 2023)Saam tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (29th December 2023):

वर्ष संपण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना सोन्याचा भाव घसरला आहे. मागच्या सहा दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसून आली आहे. मागच्या तीन आठवड्यानंतर काल सोने उच्चांकी भावावर पोहोचले होते.

आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. येत्या नवीन वर्षात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत असताना भारतातही लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातूची खरेदी केली जाते.

काल सोन्याचा भाव हा ४४० रुपयांनी वाढला होता. ४ डिसेंबर रोजी सोन्याचा (Gold) भाव प्रतितोळा ६४, ३०० रुपयांच्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचले. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Gold Silver Rate (29th December 2023)
Rules Change In 1st January 2024 : नवे वर्ष, नवे नियम! LPG पासून ते बँकेच्या नियमापर्यंत होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८७० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९७० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)प्रति किलोनुसार १२०० रुपयांनी घसरण झालेली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,३०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,८७० रुपये

  • पुणे - ६३,८७० रुपये

  • नागपूर - ६३,८७० रुपये

  • नाशिक - ६३,९०० रुपये

  • ठाणे - ६३,८७० रुपये

  • अमरावती - ६३,८७० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com