सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल
५ दिवसांत चांदीच्या दरात १३ हजारांची वाढ
चांदीचा दर उच्चांकापेक्षा १.८८ लाखांनी स्वस्त
सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले
गेल्या आठवडाभरामध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होत राहिली. सोनं आणि चांदीच्या किमती मल्टी कमोडिटी एक्सचेंजपासून देशांतर्गत बाजारापर्यंत बदलल्या आहेत. सतत किमतीमध्ये चढ-उतार होत असली तरी देखील चांदीचे दर तिच्या उच्चांकापेक्षा प्रति किलो १.८८ लाखांपेक्षा स्वस्त झाली आहे.
५ दिवसांत चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील चांदीच्या किमतीवर नजर टाकल्यास, गेल्या आठवड्यातील पाच ट्रेडिंग दिवसांत चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ३१ जुलै रोजी १ किलो चांदीचा दर २,१८,२९५ रुपये होता. पण शुक्रवारी चांदीचे दर वाढून २,३१,३८१ रुपयांवर आली आहे. हे पाहता ५ दिवसांत चांदी प्रति किलो १३,०८६ रुपयांनी महाग झाली आहे. महत्वाचे म्हणजे, चांदी अजूनही तिच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे.
गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी या वाढीनंतरही चांदी त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा खूपच स्वस्त आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी १ किलो चांदीच्या दराने पहिल्यांदाच ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक स्तर ओलांडला आणि ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. पण हा स्तर गाठल्यानंतर चांदीमध्ये मोठी घसरणही झाली. आता ताज्या वाढीनंतरही चांदी १,८८,२४४ रुपये प्रति किलोने स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चांदीनंतर सोन्याच्या दरात देखील मोठा बदल पाहायला मिळाला. MCX वर २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दर ३१ जुलै रोजी १,४३,३७६ वर बंद झाला होता. गेल्या शुक्रवारी सोन्याचे दर १,५१,९८५ वर बंद झाला होता. यानुसार, MCX सोन्याच्या दरात गेल्या ५ दिवसांत प्रति १ तोळ्यामागे ८,६०९ ने वाढ झाली आहे. IBJA नुसार, देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट १ तोळा सोन्याचे दर १,४२,८६० वरून १,४९,६२१ पर्यंत आले म्हणजे सोन्याच्या दरात ६,७६१ रुपयांनी वाढ झाली.
दरम्यान, देशांतर्गत बाजारात २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,४९,६२१ रुपयांवर पोहोले आहे, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १,४६,०३० रुपये झाले आहे. २० कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,३३,१६० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर १,२१,१९० रुपये इतका झाला आहे. यासोबतच १४ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. हे एक तोळा सोनं ९६,५१० रुपयांना विकले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.